Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसला ना मजबूत फटका! कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं

नुकतेच सोशल मीडियावर एका युझरने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत E20 पेट्रोलबाबत प्रश्न केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 19, 2025 | 05:20 PM
कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं

कोटींची Ferrari कार E20 पेट्रोलमुळे झाली खराब, चक्क सोशल मीडियावर Nitin Gadkari यांना सुनावलं

Follow Us
Close
Follow Us:
  • E20 पेट्रोल वापरल्याने करोडो रुपयांची फेरारी बिघडली.
  • मालकाच्या मित्राने सोशल मीडियावर नितीन गडकरींना केले टॅग.
  • तंत्रज्ञांच्या मते, E20 इंधनामुळे कारचे काही भाग गंजले.

गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलबाबत सोशल मीडियावर जास्त ट्रेंड होत होते. एवढेच काय देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा नागरिकांना E20 पेट्रोल वापरण्याचे आव्हान केले. तसेच अनेक ऑटो कंपन्यांनी सुद्धा E20 पेट्रोलला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, यासोबतच काहींनी या पेट्रोलच्या प्रकाराबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. अशातच आता एक Social Media पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या काही आठवड्यात, अनेक वाहन मालकांनी इंधनात मिसळलेल्या 20 टक्के इथेनॉलच्या वापराशी संबंधित विविध समस्या नोंदवल्या होत्या. या E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये विविध समस्या येत आहे अशी तारकार देखील करण्यात आली होती. अलीकडेच, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, कोट्यवधी रुपयांची फेरारी सुरू न झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून येते. या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की या कारमध्ये E20 फ्युएल भरले होते. ज्यामुळे आता ती सुरू होत नाही आहे.

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही! 2030 पर्यंत 18 पेक्षा जास्त हायब्रीड कार लाँच करणार

खराब Ferrari ची पोस्ट व्हायरल

A friend’s Ferrari was filled with E20 petrol, and just a few days later it refused to start.

The technicians say the damage is due to the E20 fuel. Now tell me, will Gadkari take responsibility for this?

After spending crores on the car, paying road tax, vehicle GST tax, and… pic.twitter.com/4j9MGBjNGS

— Rattan Dhillon (@ShivrattanDhil1) September 17, 2025


सोशल मीडिया X वरील Rattan Dhillon यांनी त्यांच्या पेजवर E20 फ्युएल भरल्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या फेरारीचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये एक फेरारी दिसते, जी Roma किंवा Portofino असू शकते, लाल फेरारी ब्रँडेड कव्हरने झाकलेली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की ही फेरारी युझरच्या मित्राची आहे. त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी कारमध्ये E20 पेट्रोल भरण्यात आले होते आणि आता ती सुरू होत नाही. त्या व्यक्तीने सांगितले की फेरारी एका सर्व्हिस सेंटरमध्ये नेण्यात आली, जिथे टेक्निशियन सांगितले की समस्येचे कारण E20 फ्युएल आहे.

नेमकं Ferrari सोबत घडले काय?

Ferrari च्या टेक्निशियनच्या मते, इथेनॉल-मिश्रित फ्युएलमुळे कारचे नुकसान झाले आहे, मात्र नेमके नुकसान किती झाले याबाबत त्यांनी उघड केलेले नाही. या समस्येमुळे धिल्लोन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कारवर कोट्यवधी रुपये खर्च करून, रोड टॅक्स, वाहन जीएसटी टॅक्स आणि फ्यूल टॅक्स भरल्यानंतर, भारतात कारच्या किंमतीपेक्षा तिप्पट खर्च करूनही त्यांना शेवटी हेच अनुभवायला मिळाले.

महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत

त्यांनी असेही नमूद केले की, खरी समस्या अशी आहे की सुपरकार्स आणि हाय-एंड कार या इंधन मिश्रणामुळे सर्वाधिक प्रभावित होतात, तरीदेखील याबद्दल कुणी बोलण्याची हिंमत करत नाही. याचे कारण म्हणजे फेज सेपरेशन, कारण इथेनॉल हवेतून ओलावा शोषून घेतो. जर कार काही दिवस थांबवून ठेवली, तर टाकीमध्ये पाणी वेगळे होऊ शकते, ज्यामुळे इंधन दहन (Combustion) बिघडते किंवा कार सुरूच होत नाही. धिल्लोन यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाही टॅग केले आहे.

Web Title: Ferrari car stop working because of e20 petrol x user tag nitin gadkari on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत
1

महाराष्‍ट्रासाठी Yamaha कडून स्‍पेशल नवरात्री फेस्टिव्‍ह ऑफर्सची घोषणा, ‘या’ दुचाकींवर होईल हजारोंची बचत

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर
2

हा आहे आत्मनिर्भर भारत! ‘या’ कंपनीने चीनला पाजले पाणी, तयार केली Rare Earth-Free EV मोटर

कार खरेदीदारांची चांदीच चांदी! GST कमी झाल्याने प्रीमियम Tata Curvv ची किंमत सुद्धा पत्त्यासारखी ढासळली
3

कार खरेदीदारांची चांदीच चांदी! GST कमी झाल्याने प्रीमियम Tata Curvv ची किंमत सुद्धा पत्त्यासारखी ढासळली

भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना ‘ही’ खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट, जाणून घ्या किंमत
4

भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना ‘ही’ खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.