Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खर्च कमी आणि परफॉर्मन्स भारी! Force Motors ची नवीन ‘ट्रॅव्हलर एन’ श्रेणी लाँच

चार दशकांहून अधिक काळ लाभलेला वारसा असलेला फोर्स ट्रॅव्हलर या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने नवीन श्रेणी निर्माण करणारा ब्रँड आहे, जो ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाजारपेठेतील हिश्श्यासह आजही आघाडीवर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 04:54 PM
खर्च कमी आणि परफॉर्मन्स भारी! Force Motors ची नवीन ‘ट्रॅव्हलर एन’ श्रेणी लाँच
Follow Us
Follow Us:

फोर्स मोटर्सकडून नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज लाँच
नवीन फोर्स ट्रॅव्हलर ग्राहकांना देणार उच्च दर्जाचा अनुभव
महत्त्वाच्या बाबी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले गेले

मुंबई: फोर्स मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्हॅनमेकर आणि आघाडीच्‍या ऑटोमोटिव्ह कंपनीने आज नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज लाँच केली. या श्रेणीमध्ये रुग्णवाहिका, डिलिव्हरी व्हॅन आणि स्कूल बस या उपयोगांसाठीच्या वेईकल्‍सचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय भर टाकणारी ही नवीन श्रेणी आराम, सुविधा, विश्वासार्हता आणि कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणते. तसेच, यामुळे मालकीचा एकूण खर्च कमी होण्यास आणि देखभाल प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे.

नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना अधिक प्रगत आणि उच्‍च दर्जाचा अनुभव प्रदान करते. या लाँचसह, फोर्स मोटर्स आता पूर्णपणे नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजकडे वळणार आहे, भविष्यातील सर्व उत्पादन या नवीन श्रेणीनुसार केले जाईल. ही नवीन श्रेणी सध्याच्या पिढीतील ट्रॅव्हलरची जागा घेईल.

चार दशकांहून अधिक काळ लाभलेला वारसा असलेला फोर्स ट्रॅव्हलर या क्षेत्रातील खऱ्या अर्थाने नवीन श्रेणी निर्माण करणारा ब्रँड आहे, जो ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बाजारपेठेतील हिश्श्यासह आजही आघाडीवर आहे. रुग्णवाहिका आणि स्कूल बसपासून ते डिलिव्हरी व्हॅनपर्यंत विविध गरजा पूर्ण करणाऱ्या ट्रॅव्हलरने उद्योगात नवनवीन मानके प्रस्थापित केली आहेत. ट्रॅव्‍हलर भारतातील सर्वात पसंतीचे रुग्णवाहिका प्लॅटफॉर्म आणि आपल्या श्रेणीतील सर्वात वेगाने वाढणारी स्कूल बस उत्पादक म्हणून समोर आली आहे.

Delhi New Traffic Rules: दिल्लीत ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांची आता खैर नाही! चलानबाबत ५ मोठे नियम बदलले

नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजच्या लाँचप्रसंगी आपले मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  प्रसन फिरोदिया म्हणाले, “फोर्स ट्रॅव्हलर अनेक वर्षांपासून भारतातील सामायिक गतिशीलता क्षेत्रात प्रस्थापित उत्पादन असून आपल्या सेगमेंटमध्ये नेतृत्व करत आहे.

नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंजच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाच्या बाबी सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मालक, चालक आणि प्रवासी यांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायांच्‍या आधारे आम्ही आराम, उपयुक्तता, विश्वासार्हता आणि मालकीचा खर्च यात सुधारणा केली आहे. तसेच, दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी करून फ्लीट ऑपरेटर्सना त्यांच्या वाहनांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता येईल, याची खात्री केली आहे.

तसेच, आम्ही ट्रॅव्हलरच्या रचनेची प्रक्रिया अधिक मजबूत केली आहे. अर्बनियाकडून मिळालेल्या अनुभवामुळे आम्हाला आमची उत्पादन प्रक्रिया आणि गुणवत्ता प्रणाली अधिक सुधारित करण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे रचनेमध्ये अधिक सुसंगतता आणि सुधारित दर्जा आला आहे. अनेक अर्थांनी, नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज ही फोर्स ट्रॅव्हलरने गेल्या अनेक वर्षांत कमावलेल्या दृढ विश्वासावर आधारित आहे. पण, आता ही वेईकल अधिक प्रगत, सक्षम आणि आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक सज्ज झाली आहे.”

nissan motor india : निसानकडून देशभरात एसी चेक-अप कॅम्प; ग्राहकांना उन्हाळ्यासाठी विशेष ऑफर्स

प्रत्यक्ष वापराच्या सुलभतेवर लक्ष केंद्रित करून नवीन फोर्स ट्रॅव्हलर एन रेंज उत्पादनाच्या अनुभवामध्ये सर्वसमावेशक सुधारणा घेऊन आली आहे. केबिनमधील वातावरणाचा दर्जा लक्षणीयरित्या वाढवताना यात अधिक आधुनिक आणि कारसारखा अनुभव देणारे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये डिजिटल क्लस्टर आणि ९-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीनसह पूर्णपणे नवीन कार-सारखे कॉकपीट, नवीन एर्गोनॉमिकली डिझाइन करण्‍यात आलेल्‍या आरामदायी सीट्स आणि केबिनमधील शांततेसाठी सुधारित एनव्‍हीएच लेव्हलचा समावेश आहे. या सोयींना अधिक प्रभावी कुलिंग देणाऱ्या नवीन एचव्‍हीएसी यंत्रणेची जोड देण्यात आली आहे. वेईकलचे व्हिज्‍युअल अपील अधिक आकर्षक करण्‍यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य भागातही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामध्ये डीआरएल व एलईडी टर्न इंडिकेटर्ससह नवीन फ्रंट फॅसिआ (समोरील भाग) आणि आधुनिक दिसणारा रिडिझाइन केलेला रिअर फॅसिआ'(मागील भाग) यांचा समावेश आहे.

Web Title: Force motors launch new force traveller n range launch automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • automobile news
  • Automobiles
  • transport

संबंधित बातम्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
1

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
2

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
3

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.