(फोटो सौजन्य-AI एआय)
बॉक्सी डिझाइन आणि आलिशान केबिन
फ्रीलँडर 8 चे डिझाइन कंपनीच्या बॉक्सी स्टाइलवर आधारित असून ते कॉन्सेप्ट 97 पासून प्रेरित आहे. समोर रेक्टेंगुलर हेडलाइट्स आणि क्लोज्ड-ऑफ फ्रंट दिल्यामुळे कारला आधुनिक इलेक्ट्रिक एसयूव्हीसारखा लूक मिळतो. तिची लांबी 5118 mm, रुंदी 2050 mm, उंची 1898 mm आणि व्हीलबेस 3040 mm आहे. आतमध्ये 46.3-इंच पॅनोरमिक डिस्प्ले आणि 15.6-इंच सेंट्रल स्क्रीन देण्यात आली आहे. दुसऱ्या रोमधील जीरो-ग्रॅविटी सीट्समध्ये हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज फंक्शनही मिळते.
हुआवेईच्या तंत्रज्ञानाचा वापर
या एसयूव्हीमध्ये रूफ-माउंटेड LiDAR सेंसर असून सर्व व्हेरिएंटमध्ये हुआवेई कियानकून ADS 5.0 इंटेलिजेंट ड्रायव्हिंग सिस्टम देण्यात आली आहे. ही प्रणाली क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8397 चिपवर काम करते. हुआवेईसोबत विकसित केलेले i-ATS इंटेलिजेंट ऑल-टेरेन सिस्टम हेही आकर्षण आहे. यामध्ये 20 टेरेन मोड्स आणि फ्रंट, सेंटर व रिअर लॉकिंग डिफरेंशियल देण्यात आले आहेत.
Jawa 42 Bobber VS Royal Enfield Himalayan 450? कोणती बाइक आहे तुमच्यासाठी योग्य?
818 एचपीची ताकद
फ्रीलँडर 8 मध्ये 800V हाय-व्होल्टेज रेंज-एक्स्टेंडेड प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. 60.3 kWh कॅटल टर्नरी लिथियम बॅटरी 310 km ची CLTC इलेक्ट्रिक रेंज देते. बॅटरी 20% ते 80% पर्यंत चार्ज करण्यासाठी फक्त 12 मिनिटे लागतात, असा दावा आहे. 1.5-लिटर 4-सिलिंडर रेंज एक्स्टेंडर आणि ड्युअल-मोटर फोर-व्हील-ड्राइव्ह मिळून 818 hp पॉवर आणि 813 Nm टॉर्क देतात. 0-100 km/h वेग गाठण्यासाठी या एसयूव्हीला केवळ 4.6 सेकंद लागतात. त्यामुळे लक्झरीसोबत वेग आणि नव्या टेक्नोलॉजीचा दमदार मेळ या कारमध्ये पाहायला मिळतो.






