Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!

केंद्र सरकारने गोवर्धन योजनेसाठी २३,७३१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून यामुळे कॉम्प्रेस्ड बायोगॅसचे उत्पादन दहा पटीने वाढेल असे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे CNG वाहनांसाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात इंधन उपलब्ध होऊन देशातील ऑटो क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 10, 2026 | 06:19 PM
‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!
Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकारने गोबरधन योजनेसाठी २३,७३१ कोटींची मंजुरी दिल्याने देशात बायोगॅसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
  • बायोगॅसचा वापर थेट सीएनजी वाहनांमध्ये करता येत असल्याने कार कंपन्यांना आणि वाहनधारकांना याचा मोठा फायदा मिळेल.
  • शेतातील कचरा आणि शेणापासून गॅस निर्मितीमुळे इंधनाचा पुरवठा वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळेल.

भविष्यात तुम्ही जेव्हा CNG कारमध्ये गॅस भराल, तेव्हा तो गॅस शेतातील कचरा, शेण आणि इतर सेंद्रिय कचऱ्यापासून तयार झालेला असेल. केंद्र सरकारच्या गोबरधन’(GOBARdhan) योजनेमुळे देशातील इंधन क्षेत्रात असाच एक मोठा बदल घडणार आहे असे दिसून येते. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय वर्तुळाकार जैवऊर्जा योजनेला (National Circular Bioenergy Scheme), म्हणजेच ‘गोबरधन’ योजनेला मंजुरी दिली आहे.

ही योजना आर्थिक वर्ष २०२७ ते २०३६ या कालावधीत राबवली जाणार असून त्यासाठी एकूण २३,७३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशात कॉम्प्रेस्ड बायोगॅस चे उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना ऑटोमोबाईल क्षेत्राशी अत्यंत निगडीत आहे. या योजनेचा ऑटोमोबाईल क्षेत्रावर कशाप्रकारे परिणाम होतो ते आज आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

सुपरकार्स, स्टंट शो अन् म्युझिक! ‘हे’ आहेत जगातील टॉप ५ ऑटोमोबाईल फेस्टिव्हल्स! जाणून घ्या डिटेलमध्ये

कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनावर भर

कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा वापर CNG वर चालणाऱ्या वाहनांमध्ये थेट केला जाऊ शकतो. शेतातील टाकाऊ कचरा, गायीचे शेण, साखरेच्या कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ आणि महापालिकेचा सेंद्रिय कचरा यांपासून सीबीजी प्लांट उभारणीस प्रोत्साहन दिले जाईल. देशांतर्गत सीबीजी उत्पादन जवळपास १० पटीने वाढवण्याचे आणि खासगी कंपन्यांना यात आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

ऑटो कंपन्यांना आणि सीएनजी कार्सना मोठा फायदा

CBG गॅस CNG मध्ये सहज मिसळला जाऊ शकतो आणि सध्याच्या सीएनजी नेटवर्क व वाहनांमध्ये वापरता येतो. त्यामुळे सीबीजीसाठी नवीन इंधन यंत्रणा उभारण्याची गरज नाही. मारुती सुझुकीने आधीच सीबीजीवर चालणारी मॉडेल्स सादर केली असून या क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. भविष्यात इतर वाहन उत्पादक कंपन्याही सीबीजी आणि सीएनजी तंत्रज्ञानावर अधिक भर देण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडच्या पठ्ठ्याने बनवली इलेक्ट्रिक फ्लाईंग कार! पाहा या सिंगल सीटर हेलिकॉप्टर कम फ्लाईंग कारची झलक

पाइपलाईन आणि गॅस स्टेशनचे जाळे

CBG प्लांट्सना सिटी गॅस नेटवर्क आणि मुख्य पाईपलाईन्सशी जोडण्यासाठी विशेष मदत केली जाईल. यामुळे उत्पादित गॅस थेट गरजू ठिकाणी पोहोचवणे सोपे होईल. याशिवाय उत्पादकांना स्थिर किंमत, खरेदीची हमी, आर्थिक मदत आणि कचरा संकलनासाठी पाठबळ दिले जाणार आहे.

पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

या योजनेमुळे केवळ गाड्यांनाच इंधन मिळणार नाही, तर शेतकऱ्यांना पिकांच्या उर्वरित कचऱ्यातून जास्त उत्पन्न मिळेल. तसेच, सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून खत आणि इंधन तयार करणे शक्य होईल, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

Web Title: Gobardhan scheme boost impact on cng cars auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • CNG

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.