Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार
या ट्रकांमध्ये ग्रीन हायड्रोजन इंटरनल कम्बशन इंजिन (H2-ICE) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री Sarbananda Sonowal यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी
या प्रकल्पाच्या अंतर्गत टाटा मोटर्स सुरुवातीला हायड्रोजनवर चालणाऱ्या प्राइम मूव्हर्सची चाचणी सुरू करणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांत हे ट्रक टप्प्याटप्प्याने बंदरात तैनात केले जातील. या उपक्रमाला बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे बंदरातील कार्गो हाताळणी प्रक्रियेत होणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
VOCPA चे अध्यक्ष सुसांता कुमार पुरोहित यांनी सांगितले की, टाटा मोटर्ससोबतचा हा सहयोग बंदराच्या नेट-झिरो उत्सर्जन उद्दिष्टासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ग्रीन हायड्रोजन ट्रकांमुळे कार्गो हाताळणीदरम्यान होणारे प्रदूषण कमी होईल आणि भारतात शाश्वत पोर्ट-आधारित लॉजिस्टिक्ससाठी नवा मापदंड निर्माण होईल.
यासाठी बंदरात 2 मेगावॅट इलेक्ट्रोलायझर आणि स्वतंत्र हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन उभारण्याचीही योजना आहे.
टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख राजेश कौल यांनी सांगितले की, हा प्रकल्प वास्तविक पोर्ट ऑपरेशन्समध्ये हायड्रोजन ट्रकांचा वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. या चाचण्यांमुळे TCO (Total Cost of Ownership) समतोल तपासण्यास मदत होईल आणि भारतातील बंदरांना स्वच्छ व शाश्वत लॉजिस्टिक्स प्रणालीकडे नेण्यास हातभार लागेल.
या ताफ्यात 55 टन क्षमतेचा टाटा प्राइमा प्राइम मूव्हर समाविष्ट असेल. हा ट्रक उच्च कार्यक्षम, किफायतशीर आणि शाश्वत वाहतूक लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.
या ट्रकमध्ये प्रीमियम प्राइमा केबिन, प्रगत ड्रायव्हर-असिस्ट सेफ्टी फीचर्स आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव देणारी रचना आहे. त्यामुळे ड्रायव्हरचा थकवा कमी होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
टाटा मोटर्स सध्या बॅटरी इलेक्ट्रिक, CNG, LNG, हायड्रोजन इंटरनल कम्बशन आणि हायड्रोजन फ्युएल सेल अशा विविध पर्यायी इंधन तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक वाहने विकसित करत आहे.
2025 मध्ये कंपनीने भारतातील प्रमुख मालवाहतूक मार्गांवर हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकांची चाचणी सुरू केली होती. याशिवाय कंपनीने 15 हायड्रोजन FCEV बसांची निविदाही जिंकली असून त्या बस सध्या भारतातील रस्त्यांवर यशस्वीपणे धावत आहेत.






