फोटो सौजन्य: ev.tatamotors.com
आजही देशात Tata Motors च्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Tata Nexon EV विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती ईएमआय भरून ती घरी आणू शकता? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
टाटा मोटर्स नेक्सॉन ईव्हीचा बेस व्हेरिएंट 13.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 13.26 लाख रुपये होते. या किमतीत, 12.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, तुम्हाला RTO साठी सुमारे 7400 रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 58 हजार रुपये द्यावे लागतील. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 12400 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर या इलेक्ट्रिक कारची ऑन-रोड किंमत 13.26 लाख रुपये होईल.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून 11.26 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.26 लाख रुपये मिळाले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा फक्त 18132 रुपये ईएमआय भरावा लागेल.
तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.26 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 18132 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टाटा नेक्सॉन ईव्हीसाठी सुमारे 3.96 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह कारची एकूण किंमत सुमारे 17.23 लाख रुपये भरावे लागतील.






