Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरो मोटोकॉर्पची अ‍ॅथर एनर्जीमध्ये १,००० कोटींची मोठी गुंतवणूक; नव्या ई-स्कूटर्स येणार बाजारात

हिरो मोटोकॉर्प अ‍ॅथर एनर्जीमध्ये ₹१,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार असून हा व्यवहार १५ दिवसांत पूर्ण होईल. या गुंतवणुकीमुळे अ‍ॅथरच्या नव्या 'ईएल' प्लॅटफॉर्मला गती मिळेल, ज्यांतर्गत फॅमिली व मॅक्सी स्कूटर्स येतील; तसेच कंपनीची पहिली बजेट-फ्रेंडली ई-स्कूटर 'अ‍ॅथर ईएल०१' २९ ऑगस्टला लाँच होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 20, 2026 | 07:48 PM
हिरो मोटोकॉर्पची अ‍ॅथर एनर्जीमध्ये १,००० कोटींची मोठी गुंतवणूक; नव्या ई-स्कूटर्स येणार बाजारात
Follow Us
Follow Us:
  • हिरो मोटोकॉर्प ई-स्कूटर मार्केटमधील पकड मजबूत करण्यासाठी अ‍ॅथर एनर्जीमध्ये ₹१,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे.
  • अ‍ॅथरच्या या नव्या प्लॅटफॉर्मवर फॅमिली, मॅक्सी आणि हाय-परफॉर्मन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ई-स्कूटर्स तयार केल्या जातील.
  • अ‍ॅथरची पहिली बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर ‘ईएल०१’ २९ ऑगस्टला लाँच होणार असून, ती रिझ्ता आणि ४५० सिरीजपेक्षा स्वस्त असेल.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात आपली पकड आणखी मजबूत करत आहे. कंपनीने बंगळुरूस्थित अ‍ॅथर एनर्जी या ई-स्कूटर उत्पादक कंपनीमध्ये तब्बल १,००० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. हा संपूर्ण व्यवहार रोख स्वरूपात होणार असून, नियामक आणि भागधारकांच्या मंजुरीनंतर पुढील १५ दिवसांत पूर्ण केला जाईल. हिरो मोटोकॉर्पकडे सध्या अ‍ॅथर एनर्जीचे २९.४८ टक्के शेअर्स आहेत. याशिवाय, हिरोच्या विडा या इलेक्ट्रिक स्कूटर्स देखील अ‍ॅथरच्या अ‍ॅथर ग्रीड फास्ट-चार्जिंग नेटवर्कचा वापर करतात.

Mahindra Upcoming Cars 2026: ‘स्कॉर्पियो-एन फेसलिफ्ट’सह ‘या’ ३ गाड्या स्वातंत्र्यदिनी लाँच करण्यासाठी सज्ज! जाणून घ्या

अ‍ॅथर एनर्जीसाठी हा मोठा बूस्ट मानला जात आहे. कंपनीने नुकतीच आपली नवी अ‍ॅथर ईएल प्लॅटफॉर्म विकसित केली असून, या प्लॅटफॉर्मवर फॅमिली स्कूटर, मॅक्सी-स्कूटर आणि हाय-परफॉर्मन्स स्कूटर अशा विविध प्रकारच्या नवनवीन मॉडेल्सची निर्मिती केली जाणार आहे.

२९ ऑगस्टला लाँच होणार सर्वात स्वस्त ‘अ‍ॅथर ईएल०१‘

अ‍ॅथर एनर्जीची पहिली बजेट-फ्रेंडली आणि मास-मार्केट इलेक्ट्रिक स्कूटर अ‍ॅथर ईएल०१ येत्या २९ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या अ‍ॅन्यूअल कम्युनिटी डे मध्ये सादर केली जाणार आहे. अ‍ॅथरचे मुख्य व्यवसाय अधिकारी रवनीत सिंग फोकेला यांनी स्पष्ट केले आहे की, ईएल०१ ची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी नसेल, मात्र ती कंपनीच्या सध्याच्या रिझ्ता आणि ४५० सिरीजपेक्षा बरीच स्वस्त असेल. सध्या अ‍ॅथरची सर्वात स्वस्त स्कूटर रिझ्ता एस ची किंमत १.१७ लाख रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) आहे.

‘या’ आहेत रॉयल एनफिल्डच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मिनिटांतच कश्या विकल्या गेल्या यांच्या प्रत्येक बाईक?

‘अ‍ॅथर ईएल०१‘ चे खास फीचर्स

डिसेंबर २०२५ मध्ये अ‍ॅथरने या स्कूटरचे पेटंट फाईल केले होते. त्यावरून या स्कूटरची खालील वैशिष्ट्ये समोर आली आहेत:

  • टायर आणि डिझाईन: यात १४ इंचाचे फ्रंट आणि १२ इंचाचे रिअर अलॉय व्हील्स मिळतील. तसेच मोठी एलईडी डीआरएल आणि एलईडी टेल-लॅम्प क्लस्टर दिले जाईल.
  • इंजिन: यामध्ये स्विंगआर्म-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर पाहायला मिळेल.
  • अ‍ॅडव्हान्स ब्रेकिंग: ही अ‍ॅथरची पहिली स्कूटर असेल ज्यामध्ये अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम दिले जाईल.
  • टेक्नॉलॉजी: स्कूटरमध्ये ७ इंचाचा टीएफटी डिस्प्ले असलेला इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अ‍ॅथरस्टॅक ७.० सॉफ्टवेअर आणि स्टँडर्ड व्हॉईस कमांड्स मिळतील.
  • बॅटरी: यात २.९ आणि ३.७ चे बॅटरी ऑप्शन्स मिळण्याची शक्यता आहे, जे अनुक्रमे १२३ किमी आणि १५९ किमीची रेंज देऊ शकतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी यात ऑनबोर्ड चार्जर (अ‍ॅथर चार्ज ड्राइव्ह कंट्रोलर) देखील दिला जाईल.
सध्या भारतीय ई-टू-व्हीलर मार्केटमध्ये ओला, टीव्हीएस आणि बजाज नंतर अ‍ॅथर एनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या नवीन परवडणाऱ्या मॉडेलमुळे अ‍ॅथरच्या विक्रीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Hero motocorp ather energy e scooters in market auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.