फोटो सौजन्य: vidadotworld (Instagram)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. यात इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सला मोठी मागणी मिळते. हीच वाढती मागणी लक्षात घेत, अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये दाखल होत आहेत. आता लवकरच देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी Hero Motocorp त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लाँच करणार आहे.
देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या हिरो मोटोकॉर्प अनेक सेगमेंटमध्ये वाहनं विकते. कंपनीने 5 जून 2025 रोजी Vida ब्रँड अंतर्गत लाँच होणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला टिझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये नवीन स्कूटरबद्दल काय माहिती मिळाली आहे. हा स्कूटर किती किमतीत लाँच केला जाईल? याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
फक्त एका छोटाश्या प्लास्टिक पार्टने Tesla चे टेन्शन वाढवले ! फटाफट रिकॉल केला जारी
हिरो विडाने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला टीझर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या नवीन टीझरमध्ये स्कूटरच्या डिझाइनबद्दल माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, कंपनीने जुलै 2025 मध्ये नवीन स्कूटर VX2 लाँच करणार असल्याचे म्हटले आहे.
सोशल मीडियावर रिलीज झालेल्या पहिल्या टिझरमध्ये स्कूटरच्या फ्रंट लूकची झलक दिसली आहे. ही स्कूटर निळ्या रंगात दाखवण्यात आली आहे आणि त्यात स्कूटरच्या हँडलची झलक उपलब्ध आहे. याशिवाय, इतर माहिती अद्याप उघड झालेली नाही.
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केले जात आहेत. सध्या, भारतीय बाजारात V2 Lite, V2 Plus आणि V2 Pro या तीन व्हेरियंटमध्ये Vida ही इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहे. नवीन स्कूटर VX2 त्यांच्या खालील पोजिशनमध्ये असणार अशी अपेक्षा आहे.
1 लाखाच्या बजेटमध्ये ‘या’ आहेत टॉप 5 सेफ्टी बाईक्स, मिळेल सुरक्षिततेची हमी
अलीकडेच, कंपनी दरमहा सुमारे 7,000 इलेक्ट्रिक स्कूटर तयार करत आहे. नवीन स्कूटर लाँच केल्यानंतर, ही उत्पादन संख्या दरमहा 15,000 युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. नवीन इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीसाठी, कंपनी देशभरात Vida डीलरशिप वाढवत आहे. सध्या Vida चे 203 टचपॉइंट्स आहेत, त्यापैकी 180 डीलरशिप 116 शहरांमध्ये आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्प येत्या 1 जुलै 2025 रोजी Vida ब्रँड अंतर्गत दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. कंपनी कमी किमतीच्या सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून जास्त ग्राहक आकर्षित होतील.
सध्याच्या विडा स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 74,000 रुपये ते 1.15 लाख रुपयांपर्यंत आहे. हिरोच्या येणाऱ्या नवीन स्कूटर पेक्षाही ही स्वस्त असू शकते, ज्याच्या मदतीने कंपनी अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते.