फोटो सौजन्य: iStock
भारतातील दुचाकी वाहनांची मार्केट वेगाने वाढत आहे आणि आता बजेट रेंजच्या बाईक्समध्येही सिंगल-चॅनल ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सारखे सुरक्षा तंत्रज्ञान आढळत आहे. हे तंत्रज्ञान विशेषतः पुढील चाक लॉक होण्यापासून रोखते, जेणेकरून ब्रेक लावताना बाईक घसरत नाही. तसेच, सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव सुद्धा देते.
जर तुम्ही १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सुरक्षित आणि परफॉर्मन्स बाईक शोधत असाल, तर आज आपण भारतातील टॉप 5 बजेट फ्रेंडली ABS बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
बजाज पल्सर NS125 आता कंपनीची सर्वात स्वस्त ABS-सुसज्ज बाईक बनली आहे. यात 124.45cc 4-व्हॉल्व्ह एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.8 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क देते. याशिवाय, त्यात 5-स्पीड गिअरबॉक्ससह CBS (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम), 17-इंच ट्यूबलेस टायर्स आणि 240 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक देखील समाविष्ट आहे. याच्या स्टायलिश डिझाइन आणि ब्रेकिंगमुळे, ही बाईक या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
627 KM रेंजसह दमदार फीचर्स ! अखेर भारतात Tata Harrier EV झाली लाँच
हिरो एक्सट्रीम 125आर (सिंगल सीट)ही एक नवीन आणि आकर्षक ऑफर आहे. यात 124.7cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 11.4 बीएचपी पॉवर आणि 10.5 एनएम टॉर्क देते. यासह, 276 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि 130 मिमी रियर ड्रम ब्रेक उपलब्ध आहेत. 5-स्पीड गिअरबॉक्स आणि परवडणाऱ्या किमतीसह, ही बाईक हिरोची सर्वात स्वस्त एबीएस बाईक बनली आहे.
या यादीत हिरोची आणखी एक बाईक आहे, ती म्हणजे एक्सट्रीम १६०आर २व्ही (2024). यात 163.2cc चे पॉवरफुल इंजिन आहे, जे 14.7 बीएचपी पॉवर आणि 14 एनएम टॉर्क देते. OBD2B व्हेरियंट मागील डिस्क ब्रेक (220 मिमी) आणि स्टॅंडर्ड व्हेरियंटमध्ये ड्रम ब्रेक आहे. ही बाईक रबर अंडरबोन डायमंड फ्रेम आणि 5-स्पीड ट्रान्समिशनसह येते.
पल्सर 150 मध्ये 149.5 सीसी इंजिन आहे, जे 13.8 बीएचपी पॉवर आणि 13.25 एनएम टॉर्क निर्माण करते. त्यात 260 मिमी फ्रंट डिस्क आणि 130 मिमी रियर ड्रम ब्रेक, तसेच यूएसबी चार्जिंग पोर्ट सारखे फीचर्स देखील आहेत.
पुन्हा एकदा Honda Civic मार्केटमध्ये कमबॅक करणार? Volkswagen Golf GTI ला मिळेल जोरदार टक्कर
यामाहा एफझेड-एस एफआय (2025) मध्ये 149 सीसी 2-व्हॉल्व्ह एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 12.2 बीएचपी पॉवर आणि 13.3 एनएम टॉर्क निर्माण करते. यात 282 मिमी फ्रंट आणि 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक आहेत, जे या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्स देतात. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते.