Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मागील 12 महिन्यात ग्राहकांवर ‘या’ बाईकने केली जादू ! Activa, Shine आणि Pulsar ला टाकले मागे

भारतीय मार्केटमध्ये टू व्हीलरची मागणी वाढताना दिसत आहे. अशातच एका बाईकने ग्राहकांना एक दोन नव्हे तर 12 महिन्यांपासून भुरळ पाडली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 27, 2025 | 04:48 PM
फोटो सौजन्य: www.heromotocorp.com

फोटो सौजन्य: www.heromotocorp.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतात नेहमीच मार्केटमध्ये टू व्हीलरचा बोलबाला राहिला आहे. आजही जेव्हा एखादी व्यक्ती आपले पहिले वाहन खरेदी करण्याचा प्लॅन करते, तेव्हा त्यांचे पहिले प्राधान्य हे बाईकलाच असते. त्यात आता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या भारतात बेस्ट फीचर्स आणि मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत आहे. यामुळे दिवसेंदिवस भारतात बाईक्सच्या विक्रीत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. आज आपण अशा एका बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी ग्राहकांना भुरळ पाडली आहे.

जर आपण गेल्या FY 25 मध्ये या सेगमेंटच्या विक्रीबद्दल बोललो तर पुन्हा एकदा Hero Splendor ने हे स्थान मिळवले आहे. या काळात हिरो स्प्लेंडरने एकूण 34,98,449 बाईक्स विकल्या आहेत. या काळात हिरो स्प्लेंडरच्या विक्रीत वार्षिक आधारावर 6.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. या विक्रीच्या आधारे हिरो स्प्लेंडरचा मार्केट शेअरही 26.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या काळात सर्वाधिक विक्री होणाऱ्या 10 दुचाकी वाहनांच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मार्केटमध्ये हवा करणारी KTM ला दुष्काळाचे दिवस ! ‘या’ प्लांटमधील प्रोडक्शन झाले ठप्प, कारण एकदा वाचाच

27 टक्क्याने वाढली Honda Shine ची विक्री

विक्री यादीत होंडा अ‍ॅक्टिव्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत होंडा अ‍ॅक्टिव्हाने एकूण 25,20,520 स्कूटर विकल्या आहेत, ज्यात वार्षिक 11.80 टक्क्याने वाढ झाली. तर होंडा शाइन या विक्री यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. या कालावधीत होंडा शाइनने एकूण 18,91,399 युनिट्स बाईक विकल्या आहेत, ज्यात वार्षिक 27.54 टक्के वाढ झाली. याशिवाय, बजाज पल्सर या विक्रीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. बजाज पल्सरच्या एकूण 13,25,816 युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये वार्षिक 6.04 टक्के घट झाली.

Suzuki Access सातव्या क्रमांकावर

दुसरीकडे, या विक्रीच्या यादीत टीव्हीएस ज्युपिटर पाचव्या क्रमांकावर होती. ज्युपिटरचे एकूण 11,07,285 स्कूटर विकल्या, वार्षिक 31.06 टक्के वाढ झाली. तर सहाव्या क्रमांकावर हिरो एचएफ डिलक्स होती. या बाईकच्या एकूण 9,72,119 बाईक विकल्या, वार्षिक आधारावर या बाइकच्या विक्रीत 6.10 टक्के घट झाली आहे. याशिवाय, सुझुकी अ‍ॅक्सेस या सातव्या क्रमांकावर होती. या कालावधीत सुझुकी अ‍ॅक्सेसने एकूण 7,27,458 स्कूटर विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 14.64 टक्के वाढ झाली आहे.

6 लाखांच्या किमतीत येते Maruti Suzuki Wagon R आणि Tata Tiago, पण दोघांपैकी सुरक्षित कार कोणती?

बजाज प्लॅटिना दहाव्या क्रमांकावर

या विक्री यादीत टीव्हीएस एक्सएल आठव्या क्रमांकावर होती, तर नवव्या क्रमांकावर TVS Apache
होती. या कालावधीत या बाईकचे एकूण 4,46,218 बाईक विकल्या गेल्या आहेत, ज्यात वार्षिक आधारावर 18.08 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बजाज प्लॅटिना विक्रीच्या या यादीत दहाव्या स्थानावर होती. या कालावधीत बजाज प्लॅटिनाच्या एकूण 4,38,740 युनिट्स विकल्या, ज्यामध्ये वार्षिक आधारावर 12.69 टक्क्यांची घट झाली.

Web Title: Hero splendor became number one bike in india 3498449 units has been sold in fy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • automobile
  • Hero MotoCorp
  • record sales

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?
2

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
3

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
4

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.