फोटो सौजन्य: Social Media
पूर्वी कार खरेदी करताना अनेक जण कारच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्ष द्यायचे. पण आज वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेत अनेक ग्राहक कारमधील सेफ्टी फीचर्सकडे जास्त लक्ष देत आहेत. ग्राहकांची हीच मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या आपल्या कार्समध्ये उत्तम सेफ्टी प्रदान करतात. कारण आजच्या ग्राहकाला सुरक्षित राइड हवी आहे.
मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. यात मारुती सुझुकी वॅगन आर आणि टाटा टियागोला चांगली मागणी मिळत आहे. भारतीय बाजारात टाटा टियागोची सुरुवातीची किंमत ही 5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टॉप व्हेरियंटसाठी 7.5 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच वेळी, मारुती सुझुकी वॅगन आरची किंमत 5.78 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी हाच किंमत 7.50 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
तरुणांची लोकप्रिय बाईक झाली अपडेट, भारतात नवीन Royal Enfield Hunter 350 झाली लाँच
या किमतीच्या तुलनेवरून हे स्पष्ट होते की टाटा टियागोचे बेस मॉडेल हे वॅगन आरपेक्षा स्वस्त आहे. जर तुमचे बजेट खूप कमी असेल आणि तुम्हाला एंट्री-लेव्हल हॅचबॅक खरेदी करायची असेल, तर टाटा टियागो तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. दोन्ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत.
टाटा टियागो तिच्या बेस व्हेरियंटमध्येही दमदार फीचर्स ऑफर करते, जसे की 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8-स्पीकर हरमन साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक एसी, 15-इंच अलॉय व्हील्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि मागील पार्किंग कॅमेरा. टियागोचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि प्रीमियम सीट अपहोल्स्ट्रीमुळे ही कार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
दुसरीकडे, मारुती वॅगन आरमध्ये 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 14-इंच अलॉय व्हील्स आणि ड्युअल-टोन इंटीरियर 4-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स सारखी चांगले फीचर्स देखील आहेत. त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट आणि ड्युअल-टोन एक्सटीरियर कलरचा पर्याय देखील आहे. परंतु, फीचर्सच्या बाबतीत, टाटा टियागो थोडी प्रीमियम फील देते.
2025 मध्ये Maruti Suzuki ‘या’ 2 SUVs आणायच्या तयारीत, ‘असा’ असेल कंपनीचा मास्टर प्लॅन
टाटा टियागोच्या पेट्रोल व्हेरिएंटचा मायलेज साधारणतः 19-20 किमी/लिटर दरम्यान आहे. त्याचा सीएनजी व्हेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.49 किमी/किलो तर एएमटी ट्रान्समिशनसह 28.06 किमी/किलो मायलेज देतो, जे खूपच चांगले आहे. विशेष म्हणजे, टियागोच्या सीएनजी मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध आहे, जो या सेगमेंटमध्ये क्वचित पाहायला मिळतो.
दुसरीकडे, मारुती वॅगन आरचे पेट्रोल व्हेरिएंट 25.19 किमी/लिटर इतके मायलेज देते आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये हा आकडा 34.05 किमी/किलोपर्यंत पोहोचतो. मात्र, वॅगन आरचे सीएनजी व्हेरियंट फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसोबतच उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ मायलेजच्या निकषावर पाहता वॅगन आर सीएनजी हा या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारा पर्याय ठरतो.
ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टाटा टियागोला 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टियागोमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखी फीचर्स स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहेत. याउलट, मारुती वॅगन आरला सेफ्टीबाबत काही प्रमाणात टीका सहन करावी लागली आहे. ग्लोबल एनसीएपीने वॅगन आरला केवळ 1-स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. परंतु, आता मारुतीने वॅगन आरमध्ये 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड स्वरूपात दिल्या आहेत.
एकंदरीत, जर तुम्हाला उत्कृष्ट सेफ्टी, स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम इंटिरिअर असलेली कार हवी असेल, तर टाटा टियागो हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचे 4-स्टार सेफ्टी रेटिंग आणि उत्तम फीचर्समुळे ही कार विशेषतः तरुण वर्गामध्ये लोकप्रिय आहे. दुसरीकडे, जर तुमचे प्राधान्य अधिक मायलेज, आणि कमी मेंटेनन्स खर्च असेल, तर मारुती सुझुकी वॅगन आर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.