
भारतीय महामार्गांवरून प्रवास करताना एका गोष्टीकडे आपले लक्ष नक्कीच जाते, ती म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेले एक प्रसिद्ध वाक्य—’HORN OK PLEASE’. आपण लहानपणापासून हे वाक्य पाहत आलो आहोत आणि बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की, मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवून पुढे जावे, एवढाच याचा साधा अर्थ आहे. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, या तीन शब्दांच्या मागे एक मोठा इतिहास दडला आहे, ज्याचे कनेक्शन थेट ‘दुसऱ्या महायुद्धाशी’ (World War II) जोडलेले आहे!
दुसरे महायुद्ध आणि डिझेलचा तुटवडा
या रंजक इतिहासाची सुरुवात झाली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. त्या वेळी जगभरात इंधनाचा, विशेषतः डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. युद्धामुळे सैन्यासाठी डिझेलचा साठा राखीव ठेवला जात असे. अशा कठीण परिस्थितीत मालवाहू ट्रक्स चालू ठेवण्यासाठी एक वेगळा मार्ग शोधण्यात आला. डिझेलऐवजी ट्रकमध्ये ‘केरोसीन’ रॉकेल वापरून गाड्या चालवल्या जाऊ लागल्या.
‘OK’ चा खरा आणि धक्कादायक अर्थ
केरोसीन हे डिझेलच्या तुलनेत अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक इंधनाचे रूप होते. केरोसीनवर चालणारे हे ट्रक्स थोडे जरी धडकले किंवा त्यांचा अपघात झाला, तर ते लगेच पेट घ्यायचे आणि त्यांचे रूपांतर एका मोठ्या बॉम्बमध्ये व्हायचे.
त्यामुळे, मागून येणाऱ्या इतर वाहनचालकांना सावध करण्यासाठी ट्रकच्या मागे एक विशेष वॉर्निंग लिहिली जाऊ लागली. ती चेतावणी म्हणजे ‘Horn Please: On Kerosene’. याचा अर्थ असा होता की, “हा ट्रक केरोसीनवर चालत आहे, त्यामुळे कृपया हॉर्न वाजवून सुरक्षित अंतर राखूनच ओव्हरटेक करा.” पुढे जाऊन याच ‘On Kerosene’ मधील ‘O’ आणि ‘K’ एकत्र करून ‘OK’ हा शब्द तयार झाला आणि तो ‘Horn Please’ च्या मध्यभागी लिहिला जाऊ लागला.
भीषण आगीत ट्रक जळून खाक, सुदैवाने चालक बचावला; हिंगोली जिल्ह्यातील घटना
काळाच्या ओघात बदललेला अर्थ
महायुद्ध संपले, केरोसीनचा वापरही बंद झाला आणि ट्रक्स पुन्हा डिझेलवर धावू लागले. मात्र, ट्रक्सच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ लिहिण्याची ही पद्धत ड्रायव्हर्सच्या अंगवळणी पडली होती. पुढील पिढ्यांनी यामागचा मूळ इतिहास विसरून याला ट्रक संस्कृतीचा एक भाग बनवले.
आज जरी या वाक्याकडे फक्त ट्रॅफिकचा एक नियम किंवा डिझाईन म्हणून पाहिले जात असले, तरी हायवेवर धावणाऱ्या या शब्दांमागे युद्धाच्या काळातील एक मोठी गरज आणि सुरक्षेचे रहस्य दडलेले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रकच्या मागे हे वाक्य वाचाल, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाची ही इंटरेसटिंग गोष्ट नक्की आठवा.