Honda Activa e आणि QC1 च्या विक्रीचे आकडे वाचून चक्रावून जाल !
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. अशातच आता मार्केटमध्ये फक्त इलेक्ट्रिक कारच नाही तर बाईक आणि स्कूटर देखील लाँच होत आहे. ग्राहक देखील इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला भरभरून प्रतिसाद देत आहेत. हीच मागणी पाहता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे.
काही महिन्यांपूर्वीच Bharat Mobility Global Expo 2025 चे आयोजन झाले होते. जिथे Honda ने त्यांची Activa e आणि QC1 लाँच केली होती. नुकतेच या दोन्ही स्कूटरच्या विक्रीचे आकडे जाहीर झाले आहेत.
आता भारतीय रस्त्यांवर दिसणार 2025 Kawasaki Ninja 650 चा जलवा, नव्या रंगात लाँच झाली बाईक
होंडाने दोन महिन्यांत त्यांच्या अॅक्टिव्हा ई आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या फक्त 2,662 युनिट्स विकल्या आहेत. होंडाने अलीकडेच ईव्ही मार्केटमध्ये एंट्री केली होती. कंपनीने फेब्रुवारी ते मार्च 2025 दरम्यान 6,400 हून अधिक Activa e आणि QC1 इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन केले आहे. तर यापैकी फक्त 2,662 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त महाग असलेली अॅक्टिव्हा ई सध्या फक्त बेंगळुरूमध्ये उपलब्ध होती. आता या स्कूटरची बुकिंग मुंबई आणि दिल्लीमध्येही सुरू झाली आहे. दुसरीकडे, परवडणारी स्कूटर QC1 आतापर्यंत सहा शहरांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये हैदराबाद, मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली आणि चंदीगड यांचा समावेश आहे.
SIAM (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) ने जारी केलेल्या आर्थिक वर्ष 2025 च्या विक्रीच्या आकडेवारीनुसार, होंडाने Activa e आणि QC1 च्या एकूण 6,432 युनिट्सचे उत्पादन केले. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये 1,862 युनिट्स आणि मार्च 2024 मध्ये 4,570 युनिट्सचे उत्पादन केले. तर कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये 560 युनिट्स पाठवले.
मार्च 2025 मध्ये 2,102 युनिट्स HMSI डीलर्सना पाठवण्यात आले. कर्नाटकातील एचएमएसआयच्या नरसापुरा प्लांटमध्ये ई-स्कूटरचे उत्पादन केले जात आहे. होंडा अॅक्टिव्हा ई मध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरी आहे, तर क्यूसी १ मध्ये फिक्स्ड बॅटरी दिली गेली आहे.
या इलेक्ट्रिक ॲक्टिव्हाची किंमत ही 1,17,000 रुपयांपासून सुरु होते, जी 1,51,600 रुपयांपर्यंत जाते. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू शकते.