फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
भारतीय बाजारात नेहमीच दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या कार्सची जोरदार चर्चा होताना दिसते. ग्राहक देखील उत्तम किमतीत चांगली रेंज देणारी आणि अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कारला जास्त प्राधान्य देत असतात. मार्केटमध्ये अनेक स्वदेशी व विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे टोयोटा.
टोयोटाने देशात अनेक उत्तम आणि चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. भारतीय मार्केटमध्ये टोयोटाच्या कार्स देखील खूप लोकप्रिय आहेत. कंपनीची Innova Hycross ही एक लोकप्रिय 7-सीटर एमपीव्ही आहे. विशेषतः कंपनीचे हायब्रिड मॉडेल ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ही कार तिच्या लक्झरी इंटिरिअर, सुरक्षितता आणि प्रीमियम कम्फर्टमुळे खूप लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे हायब्रिड मोडमध्ये कारचे मायलेज बरेच चांगले आहे, जे या कारच्या वाढत्या विक्रीचे मुख्य कारण आहे.
‘या’ 4 फीचर्समुळेच तर 2025 Hero Splendor Plus ठरते ग्राहकांसाठी खास
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस त्याच्या हायब्रिड पॉवरट्रेनसह एक उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते. ही कार इनोव्हा क्रिस्टापेक्षा चालवायला खूप सोपी आहे. शहरांमध्ये कमी वेगानेही ही कार इलेक्ट्रिक सायलेन्ससह चालवता येते. कमी स्पीडमध्येही या कारची राइड क्वालिटी ही चांगली आहे. ही कार सहजतेने ट्रिपिल डिजिट स्पीड गाठते.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एमपीव्ही दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे पहिले 2.0-लिटर चार-सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे आणि दुसरे 2-लिटर मजबूत हायब्रिड इंजिन (पेट्रोल + इलेक्ट्रिक) देखील उपलब्ध आहे. यासोबतच, ट्रान्समिशनसाठी CVT ऑटोमॅटिकची सुविधा उपलब्ध देखील आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचे हायब्रिड मॉडेल 23 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.
कंपनी इनोव्हा हायक्रॉसमध्ये 52 लिटरचे फ्युएल टॅंक उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड मॉडेल असेल, तर एकदा याचे फ्युएल टॅंक पूर्ण भरले की, 1100 किमी पेक्षा जास्त अंतर सहज कापता येते. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या हायब्रिड मॉडेलची किंमत 26.31 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, दुचाकी आडवी पाडून केले जोरदार निदर्शने
टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, या कारचे केबिन देखील उत्तम आहे. या कारमध्ये भरपूर स्पेस पाहायला मिळते. टोयोटा कारच्या दुसऱ्या रांगेतही भरपूर जागा आहे, जी या रेंजच्या कारमध्ये चांगली मानली जाते. जर तुम्ही तसं पाहिलं तर, हायब्रिड कार सर्वोत्तम मायलेज देण्यासाठी ओळखल्या जातात आणि ही कार अशीच एक कार आहे.