फोटो सौजन्य: @saaaanjjjuuu (X.com)
हल्ली इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत होणारी वाढ. तसेच आता वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनं लाँच होत आहे. दुचाकी विभागात देखील आता अनेक ऑटो कंपन्या बेस्ट इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर ऑफर करीत आहे.
स्कूटर म्हंटलं की अनेक जणांच्या डोळ्यांसमोर होंडा अॅक्टिव्हा उभी राहते. आजही मार्केटमध्ये ग्राहकाचा विश्वास या स्कूटरवरून कमी झालेला नाही. म्हणूनच तर कंपनीने या स्कूटरचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहे. Honda Activa e असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. होंडाने सर्वप्रथम बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक अॅक्टिव्हा लाँच केली आहे. यानंतर कंपनी देशात ही इलेक्ट्रिक स्कूटर टप्याटप्याने लाँच करणार आहे. ही स्कूटर मार्केटमध्ये लाँच झाल्यानंतर एक वेगळीच क्रेझ याबद्दल निर्माण झाली होती.
होंडा कंपनीने ही स्कूटर बॅटरी स्वॅपिंग प्लॅनसह आणली आहे. म्हणजेच बॅटरी स्वॅप करून ही स्कूटर न थांबता चालवता येते. आता या इलेक्ट्रिक स्कूटरच्या खऱ्या रेंजबद्दल माहिती समोर आली आहे. कंपनीचा दावा आहे की Activa-E ची रेंज 102 किमी आहे. परंतु, त्याच्या वास्तविक रेंजचे आकडे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. चला या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
होंडा अॅक्टिव्हा-ई नुकतीच बेंगळुरूमध्ये लाँच झाली आहे. अशावेळी, बेंगळुरूच्या रस्त्यांवर त्याची रिअल वर्ल्ड रेंज टेस्ट देखील घेण्यात आली. कंपनीने यामध्ये 1.5kWh क्षमतेची स्वॅपेबल ड्युअल बॅटरी सेट केली आहे. जे पूर्ण चार्ज केल्यावर 102 किमीची रेंज देण्याचा दावा करते. पण जेव्हा स्कूटर पूर्णपणे चार्ज झालेल्या बॅटरीने सुरू केली तेव्हा ओडोमीटरने 102 किमीची रेंज दाखवली होती.
बेंगळुरू शहरातील रहदारीत ही स्कूटर चालवायला सुरुवात केली. त्यानंतर, जेव्हा दोन्ही बॅटरी डिस्चार्ज झाल्या, तेव्हा ही स्कूटर फक्त 56.6 किमी धावू शकली. याचा अर्थ, कंपनीने केलेल्या 102 किमीच्या दाव्याच्या तुलनेत, ही स्कूटर 45.4 किमी कमी धावली. एकूणच, या स्कूटरची रेंज ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी, बजाज चेतक ईव्ही, टीव्हीएस आयक्यूब सारख्या मॉडेल्सच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे दिसून आले.
Sonu Sood च्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात ! ‘या’ इलेक्ट्रिक कारमधून सुरु होता प्रवास
होंडाने अॅक्टिव्हा ई इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 1.5kWh क्षमतेचा स्वॅपेबल ड्युअल बॅटरी सेटअप दिला आहे. या दोन्ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 102 किमीची रेंज देण्याचा दावा करतात. .
या स्कूटरला पॉवर एका सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटरद्वारे दिली जाते जी 22 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. यात तीन रायडिंग मोड आहेत – इकॉन, स्टँडर्ड आणि स्पोर्ट. त्याचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे. त्याच वेळी, ते 7.3 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग गाठू शकते. यात 7 इंचाचा टीएफटी स्क्रीन आहे.