भारतात इलेक्ट्रिक कार खरेदी खरेदी करणे होणार स्वस्त? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा महत्वाचा निर्णय
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची किंमत मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पूर्वी अनेक ऑटो कंपन्या इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादनांची करीत होत्या, पण आता इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाढती मागणी पाहून याच कंपन्या इलेक्ट्रिक कारच्या उत्पदनावर लक्षकेंद्रित करत आहे. यामुळे आगामी काळात नक्कीच, भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सचाच बोलबाला असणार आहे. भारतीय सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून विविध सकारात्मक उपाययोजना करीत आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारची मागणी काळानुसार वाढत चालली आहे. देशात या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढवण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी मोठे निर्णय घेत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, 25 मार्च 2025 रोजी आणखी एक मोठी घोषणा केली, ज्यामध्ये असे सांगण्यात आले की भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्ही बॅटरीच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या 35 कॅपिटल गुड्सवर कोणतेही इम्पोर्ट ड्युटी आकारणार नाही.
Tata Harrier च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती? डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल म्हणजेच 25 मार्च रोजी संसदेत फायनान्स बिल 2025 सादर केले. ईव्ही बॅटरीवरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याच्या निर्णयाबद्दल अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ‘आम्हाला देशात देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे आणि कच्च्या मालावरील इम्पोर्ट ड्युटी कमी करून निर्यातीतील स्पर्धात्मकता देखील वाढवायची आहे’. भारत इतर देशांकडून अशा 35 वस्तू खरेदी करतो, ज्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बनवण्यासाठी वापरल्या जातात.
केंद्र सरकार अमेरिकेने लादलेल्या रेसिप्रोकेल टॅरिफचा परिणाम कमी करण्याचा विचार करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 पासून जगातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तानुसार, भारत सरकार अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा करेल. भारत सरकार अमेरिकेतून होणाऱ्या सुमारे 1.9 लाख कोटी रुपयांच्या (23 अब्ज डॉलर्स) आयातीवरील अर्ध्याहून अधिक वस्तूंवर इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा विचार करू शकते.
Sonu Sood च्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात ! ‘या’ इलेक्ट्रिक कारमधून सुरु होता प्रवास
गेल्या आठवड्यात झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी कच्च्या मालावरील इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. आता सरकारने ईव्ही बॅटरी आणि मोबाईल फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीवरील इम्पोर्ट ड्युटी पूर्णपणे काढून टाकले आहे. ईव्ही बॅटरीवरील इम्पोर्ट ड्युटी रद्द केल्याने, इलेक्ट्रिक कारच्या किमतीतही घट होईल.