(फोटो सौजन्य-AI एआय)
या मोटरसायकलमध्ये नवीन 501 cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. इंजिनला ऑइल कूलरची जोड असून ते 28 hp पॉवर आणि 43.3 Nm पीक टॉर्क तयार करते. 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत Slipper Clutch देण्यात आला आहे. त्यामुळे गिअर डाउन करताना मागच्या चाकावर अचानक होणारा ताण कमी करण्यास मदत होते.
Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख
डिझाइनच्या बाबतीत CB 500 ला Heritage Roadster स्वरूप देण्यात आले आहे. गोल LED हेडलॅम्प, मस्क्युलर फ्युल टँक, लांब रिब्ड सीट आणि सरळ हँडलबार यामुळे मोटरसायकलला क्लासिक लूक मिळतो. क्रोम फिनिश आणि ओल्ड स्टाईल मडगार्डसोबत फुल LED लाइटिंगसारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत.
होंडाने CB 500 ला तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. बेस Alloy व्हेरिएंटमध्ये Alloy Wheels मिळतात. पुढील Spoke Tubeless व्हेरिएंटमध्ये Cross-Spoke Wheels आणि Tubeless Tyres देण्यात आले आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये याच व्हील सेटअपसोबत विशेष Stripe Graphics मिळतात. त्यामुळे किंमतीतील फरक व्हील आणि कॉस्मेटिक अपडेट्सशी संबंधित आहे.
फीचर्सच्या बाबतीत CB 500 मध्ये Honda Selectable Torque Control, Dual-Channel ABS आणि दोन्ही चाकांवर Disc Brakes देण्यात आले आहेत. Analogue-Digital Instrument Console सोबत Honda RoadSync कनेक्टिव्हिटी मिळते. यामुळे स्मार्टफोनशी जोडून नेव्हिगेशन आणि काही कम्युनिकेशन फंक्शन्स वापरता येतात.
होंडा युनिकॉर्नसाठी कोणती Accessories किती रुपयांना? पाहा संपूर्ण यादी
सस्पेन्शनसाठी पुढे Telescopic Fork आणि मागे Twin Shock Absorbers देण्यात आले आहेत. होंडाने CB 500 भारतातच तयार केली आहे. कर्ब वेट, सीट हाइट, फ्युल टँक क्षमता आणि टायरचे संपूर्ण तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.
किंमतीच्या बाबतीत CB 500 चा सामना मोठ्या क्षमतेच्या रेट्रो रोडस्टर्सशी होतो. रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 आणि BSA गोल्ड स्टार 650 ही त्याच प्रकारच्या कस्टमर्सना आकर्षित करणारी मॉडेल्स आहेत. त्यामुळे 500 cc सेगमेंटमध्ये होंडाने लोकल प्रोडक्शनसह नवा ऑप्शन आणला आहे.






