Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा

Honda CB250SS Concept मध्ये निओ-रेट्रो डिझाइन, गोल्ड फिनिशमधील फ्रंट फोर्क्स, Honda RoadSync कनेक्टिव्हिटी आणि असिस्ट-स्लिपर क्लच मिळतो. चीनमध्ये 2027 मध्ये प्रोडक्शन मॉडेल येण्याची शक्यता आहे. पण भारतात ही बाईक लाँच होणार का, याबाबत अद्याप कोणतीही ऑफीशियल घोषणा झालेली नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 13, 2026 | 09:29 PM
Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
Follow Us
Follow Us:
  • होंडाने चीनमधील CIMA मोटरसायकल शोमध्ये 249cc इंजिन असलेली CB250SS Concept बाईक सादर केली.
  • गोल TFT डिस्प्ले, Honda RoadSync कनेक्टिव्हिटी आणि गोल्ड फिनिशमधील फ्रंट फोर्क्स हे प्रमुख आकर्षण आहे.
  • चीनमध्ये 2027 मध्ये प्रोडक्शन मॉडेल येण्याची शक्यता आहे, पण भारतातील लाँच अद्याप निश्चित नाही.

होंडा कंपनीने चीनमधील चोंगकिंग येथे आयोजित CIMA मोटरसायकल शोमध्ये आपली नवीन Honda CB250SS Concept बाईक सादर केली आहे. निओ-रेट्रो डिझाइन आणि स्क्रॅम्बलर स्टाइलचा मिलाफ असलेली ही बाईक सध्या दुचाकीप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. ही बाईक भारतात येणार की चीनपुरतीच मर्यादित राहणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही ऑफीशियल माहिती दिलेली नाही.

डिझाइनच्या बाबतीत CB250SS मध्ये क्लासिक आणि आधुनिक स्टाइल एकत्र पाहायला मिळते. गोल आकाराचा TFT डिस्प्ले, आकर्षक बॉडी डिझाइन आणि गोल्ड फिनिशमधील अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क्स यामुळे बाईकला प्रीमियम लूक मिळतो. शोमध्ये प्रदर्शित केलेल्या मॉडेलच्या इंजिन आणि फोर्क्सवर गोल्ड फिनिश दिसले, पण कंपनीच्या अधिकृत रेंडर्समध्ये हे फिनिश दिसत नाही. त्यामुळे प्रोडक्शन मॉडेलमध्ये नेमके कोणते बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी

या बाईकमध्ये 249cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. होंडाच्या माहितीनुसार, हे इंजिन कमी आरपीएमवर चांगला टॉर्क आणि वेग वाढवताना सुरळीत पॉवर डिलिव्हरी देण्यासाठी ट्यून करण्यात आले आहे. कंपनीने अद्याप इंजिनची अधिकृत पॉवर आणि टॉर्क आकडेवारी जाहीर केलेली नाही. या इंजिनचे तंत्रज्ञान संबंधित CM250, CB250R आणि Rebel 250 मॉडेल्सशी मिळतेजुळते असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण CB250SS साठी नेमके कोणते स्पेसिफिकेशन वापरले जाईल, हे स्पष्ट झालेले नाही.

रायडिंग आरामदायी करण्यासाठी या बाईकमध्ये Pro-Link मल्टी-लिंक मागचे सस्पेन्शन, असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच दुसऱ्या जनरेशनची Honda RoadSync कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हलकी आणि अधिक चपळ फ्रेम असल्याचा कंपनीचा दावा आहे. पुढील आणि मागील बाजूस 17-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कमी प्रवासाचे सस्पेन्शन आणि रस्त्यावर वापरण्यास अनुकूल फुटपेग्स पाहता, ही बाईक अत्यंत कठीण ऑफ-रोडिंगपेक्षा शहरातील प्रवास आणि स्टायलिश रोड रायडिंगसाठी जास्त योग्य ठरू शकते.

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

या कॉन्सेप्ट बाईकमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टरसह रस्त्यावर वापरण्यायोग्य दिसणारी एक्झॉस्ट सिस्टीम आहे. त्यामुळे प्रोडक्शन मॉडेल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये 2027 च्या वसंत ऋतूत तिची विक्री सुरू होऊ शकते, पण ही अद्याप ऑफीशल तारीख नाही. भारतातील लाँच, किंमत आणि कन्फर्म फीचर्सबाबत होंडाकडून घोषणेची प्रतीक्षा आहे.

Web Title: Honda cb250ss concept bike design engine features china launch auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda

संबंधित बातम्या

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी
1

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
2

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा
3

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?
4

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.