Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा

10 रुपयांची नाणी साठवून 3 वर्षांत जमवले तब्बल 1.23 लाख रुपये! तेलंगणातील बी. रवी जोसेफ यांनी या पैशांतून नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी केली. शोरूममध्ये 12,300 नाणी घेऊन पोहोचलेल्या जोसेफ यांची ही अनोखी बचत पाहून तुम्हालाही रोज थोडे पैसे बाजूला ठेवण्याची प्रेरणा मिळेल!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 13, 2026 | 06:37 PM
ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा
Follow Us
Follow Us:
  • तेलंगणातील बी. रवी जोसेफ यांनी 3 वर्षे 10 रुपयांची नाणी साठवून 1.23 लाख रुपये जमवले
  • तब्बल 12,300 नाण्यांतून त्यांनी नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर खरेदी केली
  • शोरूमने नाणी स्वीकारण्यास होकार दिल्यानंतर जोसेफ यांनी संपूर्ण व्यवहार पूर्ण केला

पैसे वाचवण्यासाठी मोठी कमाईच पाहिजे असे नाही, तर नियमित बचतीची सवयही महत्त्वाची असायला लागते. आणि माणसाचे भन्नाट शौक त्याला काय काय करायला लावतील, ते देवच जाणे. तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यातील बी. रवी जोसेफ यांनी हेच दाखवून दिले आहे. त्यांनी तब्बल 3 वर्षे दररोजच्या व्यवहारांतून मिळणारी 10 रुपयांची नाणी बाजूला ठेवली आणि त्यातून 1.23 लाख रुपये जमवले. या बचतीतून त्यांनी नवीन होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटर खरेदी केली. त्यांच्या या अनोख्या बचतीची आणि खरेदीची चर्चा आता सोशल मीडियावर जोरदार होत आहे.

रोजच्या व्यवहारातून केली छोटी-छोटी बचत

रवी जोसेफ हे व्यवसायाने पाद्री आहेत. भाजीपाला, किराणा सामान आणि घरासाठी लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करताना त्यांच्या हातात उरलेली 10 रुपयांची नाणी ते नियमितपणे साठवून ठेवत होते. ही नाणी खर्च करण्याऐवजी त्यांनी ती एका ठिकाणी जमा केली. दिवसागणिक जमा होणारी छोटी रक्कम 3 वर्षांत मोठ्या बचतीत बदलली.

या काळात त्यांनी एकूण 1,23,000 रुपये जमा केले. यासाठी त्यांना तब्बल 12,300 नाणी साठवावी लागली. कुटुंबासाठी उपयोगी वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही बचत सुरू केली होती. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ही पद्धत कितपत उपयोगी ठरेल, याबाबत शंका होती. पण नंतर त्यांनीही जोसेफ यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला.

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

जुन्या दुचाकीला वारंवार त्रास; नवीन स्कूटर घेण्याचा निर्णय

रवी जोसेफ यांच्याकडे आधीपासून मोटरसायकल होती. पण ती वारंवार बिघडत असल्याने आणि व्यवस्थित चालत नसल्याने त्यांनी नवीन वाहन घेण्याचा विचार केला. त्यासाठी वर्षानुवर्षे जपून ठेवलेली बचत वापरण्याचे त्यांनी ठरवले. अखेर 10 रुपयांच्या नाण्यांतून जमा केलेल्या पैशांतून त्यांनी होंडा अ‍ॅक्टिव्हा खरेदी केली.

शोरूमने स्वीकारली 12,300 नाणी

या खरेदीतील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे संपूर्ण रक्कम नाण्यांच्या स्वरूपात देण्यात आली. शोरूमच्या व्यवस्थापकाच्या माहितीनुसार, जोसेफ यांनी स्कूटर खरेदीच्या सुमारे 15 दिवस आधी डीलरशिपशी संपर्क साधून 10 रुपयांची नाणी स्वीकारली जातील का, याची चौकशी केली होती. शोरूमने होकार दिल्यानंतर ते 1.23 लाख रुपयांची नाणी घेऊन आले आणि व्यवहार पूर्ण केला.

2027 होंडा रिबेल 500 मध्ये मोठे अपडेट! आता मिळणार TFT डिस्प्ले आणि E-Clutch टेक्नोलॉजी

या घटनेतून नियमित बचतीची ताकद दिसून येते. रोज बाजूला ठेवलेली छोटी रक्कमही योग्य नियोजन आणि संयमाच्या जोरावर मोठ्या उद्दिष्टासाठी उपयोगी पडू शकते. जोसेफ यांची ही कहाणी बचतीची सवय लावू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.

Web Title: Telangana man buys honda activa with ten rupee coins auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?
1

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?

KTM अन् TVS ला टक्कर द्यायला कावासाकीची Z300 मैदानात! 20 ऑक्टोबरला होणार मोठा खुलासा
2

KTM अन् TVS ला टक्कर द्यायला कावासाकीची Z300 मैदानात! 20 ऑक्टोबरला होणार मोठा खुलासा

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज
3

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज

ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क
4

ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.