Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत

भारतातील ऑटोमोबाईल सेक्टर वेगाने वाढत आहे त्यात स्कूटरचही मार्केट चांगलाच जोर धरत आहे. उत्पादकांनी आता केवळ मूलभूत मायलेज मॉडेल्सवर लक्ष केंद्रित न करता आता स्टायलिश आणि प्रीमियम मॉडेल्स मार्केटमध्ये आणत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 09, 2026 | 07:53 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • Honda Airblade ही स्कूटर भारतात पेटंट
  • आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध
  • ‘प्रीमियम स्कूटर segment मध्ये स्पर्धा
Honda Airblade: भारतातील ऑटोमोबाईल सेक्टर वेगाने वाढत आहे त्यात स्कूटरचही मार्केट चांगलाच जोर धरत आहे. त्यामुळे उत्पादकांनी आता केवळ मूलभूत आणि मायलेज-केंद्रित मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करण्यापलीकडे जाऊन, आता स्टायलिश आणि प्रीमियम मॉडेल्सना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः, स्पोर्टी डिझाइन आणि प्रगत वैशिष्ट्ये असलेल्या स्कूटर्सची मागणी तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तशाच प्रकारच्या डिझाईन आणि फीचर्स देण्याऱ्या स्कूटर्स मार्केटमध्ये हवा करत आहेत.

‘Honda Airblade ही स्कूटर भारतात पेटंट

या क्रेझला फॉलो करत Honda कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेली ‘Honda Airblade ही स्कूटर भारतात पेटंट करून घेतली आहे. भविष्यात कंपनी ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर करू शकते, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.पण या स्कूटरच्या लाँचिंगबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनेकदा केवळ डिझाइनच्या संरक्षणासाठी पेटंट दाखल केले जात असले, तरीही अशा प्रकारच्या कृतीमुळे भविष्यात ती स्कूटर लाँच होण्याची शक्यता निश्चितच बळावते.

कसे आहेत स्कूटरचे फीचर्स?

Honda Airblade ही स्कूटर सध्या अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि तिथे तिला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. आपल्या स्पोर्टी लूक, शक्तिशाली इंजिन आणि आधुनिक वैशिष्ट्यांमुळे ही स्कूटर तरुणाईमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. तिची रचना standard स्कूटरपेक्षा पूर्णपणे वेगळी असून, ती अधिकच aggressive दिसते. या स्कूटरमध्ये सुस्पष्ट आणि रेखीव बॉडी पॅनेल्स, हवेचा रोध कमी करणारी पुढील रचना आणि स्टायलिश LED हेडलाईट्स यांचा समावेश आहे; या सर्व घटकांमुळे तिला एक ‘प्रीमियम’ अनुभव देते.

स्कूटरचे इंजिन

इंजिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये साधारणपणे १५० cc ते १६० cc क्षमतेचे इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन केवळ शहरातील वाहतुकीतून मार्ग काढण्यासाठीच नव्हे, तर लांब पल्ल्याचा प्रवास आणि महामार्गावरील प्रवासासाठीही अत्यंत आदर्श मानले जाते. नेहमीच्या स्कूटर्सच्या तुलनेत हे इंजिन लक्षणीयरीत्या अधिक शक्तिशाली आहे; ज्यामुळे या स्कूटरला acceleration आणि अत्यंत सुरळीत मिळते.

दरदार फीचर्स

features बाबतीतही ही स्कूटर बऱ्याच प्रगत मानली जाते. यामध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्मार्ट की सिस्टीम, सीटखालील प्रशस्त storage, USB चार्जिंग पोर्ट आणि आधुनिक ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. काही आंतरराष्ट्रीय मॉडेल्समध्ये ABS आणि ‘स्मार्ट स्टार्ट’ तंत्रज्ञान यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्येही उपलब्ध आहेत. नेमक्या याच कारणामुळे, या स्कूटरकडे केवळ एक सामान्य स्कूटर म्हणून न पाहता, एक ‘प्रीमियम अर्बन स्कूटर’ म्हणून पाहिले जाते.

जर हे मॉडेल भारतात सादर केले गेले, तर ते देशातील ‘प्रीमियम स्कूटर segment मध्ये स्पर्धा करेल. सध्या भारतीय बाजारपेठेत १२५ cc आणि १६० cc क्षमतेच्या स्कूटर्सची लोकप्रियता वेगाने वाढत आहे; त्यामुळे, कंपनी ही स्कूटर प्रामुख्याने तरुण ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून बाजारात आणण्याची शक्यता आहे.

Web Title: Honda premium scooter will launch india soon airblade maxi style two wheeler powerful engine see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • Honda
  • Marathi News

संबंधित बातम्या

Beed : “जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, त्यांना आमदार कोण करणार” – गुणरत्न सदावर्ते
1

Beed : “जरांगे ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाहीत, त्यांना आमदार कोण करणार” – गुणरत्न सदावर्ते

Navi Mumbai : मोरबे धरणाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी
2

Navi Mumbai : मोरबे धरणाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ
3

Bank of India चा नफा 10500 कोटींच्या पार! आर्थिक कामगिरीत वार्षिक 14.19 टक्क्यांची दमदार वाढ

Car Buying Tips: सेकंड हँड कार घेताना ‘ही’ चूक ठरू शकते महागात; अपघातग्रस्त गाडी ओळखण्याचे सोपे मार्ग
4

Car Buying Tips: सेकंड हँड कार घेताना ‘ही’ चूक ठरू शकते महागात; अपघातग्रस्त गाडी ओळखण्याचे सोपे मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.