Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवाई प्रवाशांचा जीव धोक्यात! सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्याने IndiGo ला लागली मोठी फटकार; किती भरावा लागला दंड?

इंडिगो एअरलाईन्सला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने DGCA सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणाबद्दल फटकारले आहे. खरंच प्रवाश्यांच्या सुरक्षेचा इतका गंभीर प्रश्न उभा राहतो का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 11, 2026 | 05:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • IndiGo ला लागली मोठी फटकार
  • सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष
  • किती भरावा लागला दंड?
Indigo Flight Disruption : हवाई प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. पण नंतर कंपनीवर विश्वास ठेवून आपला प्रवास सुरु करतो. पण याच विश्वासावर कधी गदा आली तर? अशीच काहीशी परिस्थिती सध्या Indigo विमान कंपनीबाबत उपस्थितत होत आहे. पदेशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोला, सुरक्षा आणि नियमांचे पालन करण्यासंदर्भात पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागत आहे. विमान वाहतूक नियामक डीसीजीएने (DCGA) धोकादायक वस्तू हाताळण्यातील निष्काळजीपणाबद्दल विमान कंपनीला इशारा दिला आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

डीसीजीएच्या तपासात असे आढळून आले आहे की, स्थापित सुरक्षा कार्यपद्धतींचे पालन केले गेले नाही. या कारवाईमुळे प्रवासी सुरक्षेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण डीसीजीएने अद्याप या प्रकरणात दंड आकारलेला नाही, परंतु नियमांमध्ये सुधारणा करण्याचा इशारा दिला आहे आणि विमान कंपनीकडून कारवाई अहवाल मागवला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

DCGA ने केलेल्या तपासणीत इंडिगोच्या अभियांत्रिकी, साठवणूक आणि धोकादायक वस्तू हाताळणी प्रक्रियेत त्रुटी आढळून आल्या. या तपासणीत असे उघड झाले की, काही प्रकरणांमध्ये धोकादायक वस्तू हाताळण्यासाठीचे नियम आणि प्रमाणित कार्यपद्धतींचे पूर्णपणे पालन केले गेले नव्हते. एअरलाइनने धोकादायक वस्तूंच्या एका खेपाशी संबंधित घटनेचाही उल्लेख केला. यानंतर, डीजीसीएने सुरक्षा नियमांवर कठोर भूमिका घेतली आणि इंडिगोला सुधारणा करण्याचे निर्देश दिले.

DCGA ने इंडिगोविरुद्ध आता पर्यंत केलेल्या मोठा कारवाया ?

१. जुलै २०२६

DCGA ला एका विशेष ऑडिटमध्ये असे आढळून आले की, इंडिगोने धोकादायक वस्तू हाताळण्याशी संबंधित काही सुरक्षा नियम आणि एसओपींचे पूर्णपणे पालन केले नव्हते. यानंतर, एअरलाइनला एक चेतावणी पत्र जारी करण्यात आले आणि एका महिन्याच्या आत सुधारणांवर अहवाल देण्यास सांगण्यात आले. या प्रकरणात कोणताही दंड आकारण्यात आला नाही, केवळ चेतावणी देण्यात आली.

२. जानेवारी २०२६

डिसेंबर २०२५ मध्ये हजारो उड्डाणे रद्द केल्याबद्दल आणि त्यांना विलंब झाल्याबद्दल DCGA ने इंडिगोवर २२.२० कोटी रुपयांचा विक्रमी दंड लावला. तपासणीत कार्यान्वयन नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन आणि नियामक तयारीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी डीसीजीएने एअरलाइनकडून ५० कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीची मागणीही केली.

३. ऑक्टोबर २०२५

पायलट प्रशिक्षणातील त्रुटी आणि ‘कॅटेगरी सी’ विमानतळ कार्यान्वयनाच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल DCGA ने इंडिगोवर २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. एअरलाइनने नंतर सांगितले की ती या आदेशाला आव्हान देईल.

४. डिसेंबर २०२५

उड्डाणे रद्द होण्याच्या संकटकाळात, DCGA ने इंडिगोच्या सीईओसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. इतकेच नव्हे तर, एअरलाइनच्या उड्डाणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले, विमानतळांवर आणि कार्यान्वयन नियंत्रण केंद्रांवर अधिकारी तैनात करण्यात आले आणि कंपनीकडून नियमित अहवाल मागवण्यात आले. ही कारवाई नंतर २२.२० कोटी रुपयांच्या दंडाचा आधार बनली.

प्रवासी सुरक्षेवर काय परिणाम ?

विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः धोकादायक वस्तूंच्या बाबतीत, वस्तूंची योग्य ओळख, पॅकेजिंग आणि वाहतूक यामधील अगदी किरकोळ निष्काळजीपणा देखील मोठा धोका निर्माण करू शकतो. प्रवासी सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे की नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी DCGA विमान कंपन्यांवर सतत देखरेख ठेवते. इंडिगोला दिलेला इशारा याच देखरेखीचा एक भाग आहे.

40 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-न्यूझीलंडमध्ये मोठा करार, तब्बल 35000 कोटींचा होणार व्यापार, ‘या’ क्षेत्रांचं नशीब चमकणार

Web Title: Indigo faces a severe reprimand for ignoring safety norms how much fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Airline
  • Aviation
  • Business News
  • IndiGo flight
  • IndiGo Flights
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.