
फोटो सौजन्य: Gemini
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, होंडा Honda CBR 650r आणि Honda हॉर्नेट 1000SP साठी रिकॉल जारी करण्यात आला आहे.
Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
होंडाने या दोन्ही बाईक्सच्या किती युनिट्सवर परिणाम झाला आहे हे उघड केलेले नाही. मात्र, उत्पादकाने असे म्हटले आहे की 16 डिसेंबर 2024 ते 4 मे 2025 दरम्यान उत्पादित केलेल्या CBR650R च्या काही युनिट्स आणि 30 सप्टेंबर 2024 ते 22 ऑगस्ट 2025 दरम्यान उत्पादित केलेल्या CB1000 हॉर्नेट एसपीच्या काही युनिट्सवर परिणाम होऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही बाईकच्या काही युनिट्समध्ये काही घटकांशी संबंधित कारणांमुळे तेलाचा वापर वेगवेगळ्या प्रमाणात होऊ शकतो. जर तेलाची पातळी नियमितपणे तपासली गेली नाही, तर तेलाच्या दाबात बदल होऊन इंजिनच्या सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादक कंपनीने ठराविक कालावधीत तयार करण्यात आलेल्या बाईक्स तपासणीसाठी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये आणण्याचा सल्ला दिला आहे.
कंपनीकडून ज्या ग्राहकांना रिकॉलची माहिती देण्यात येत आहे, त्यांनी आपली बाईक जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावी. तेथे बाईकची तपासणी केली जाईल आणि ज्या युनिट्समध्ये अशी कोणतीही त्रुटी आढळेल, त्या युनिट्समधील संबंधित भाग कोणताही अतिरिक्त शुल्क न घेता बदलून देण्यात येईल.