फोटो सौजन्य: Social Media
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईकच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यात सर्वात जास्त डिमांड ही बजेट फ्रेंडली बाईक्सला असते. त्यामुळेच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या भारतात स्वस्त किंमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. होंडा ही त्यातीलच एक कंपनी, ज्या ग्राहकांच्या या मागणीला ओळखत बाजारात चांगल्या बाईक आणल्यात. अशीच एक बाईक म्हणजे Honda Shine.
होंडा शाइन ही भारतीय मार्केटमधील सर्वोत्तम परवडणारी मायलेज बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकच्या विक्रीच्या आकडेवारीवरून तुम्ही त्याची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज लावू शकता. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये 1.69 लाख ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे 18 टक्क्यांनी वाढ दर्शवते.
Kia Carens Clavis आणि Kia Carens च्या किमतीत फक्त 9000 हजारांचा फरक, कोणती MPV आहे बेस्ट?
होंडा शाइन 125 ची एक्स-शोरूम किंमत 83 हजार ते 87 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच वेळी, शाइन 100 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 67 हजार रुपये आहे. होंडा शाइनच्या 2025 मॉडेलमध्ये पूर्णपणे डिजिटल डॅश बसवण्यात आला आहे. ही बाईक रायडर्ससाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
या अपडेटसह, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर आणि वाहनाचे अंतर डिस्प्ले यासारखे अनेक नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. या होंडा बाईकमध्ये डॅशजवळ यूएसबी-टाइप सी पोर्ट बसवण्यात आला आहे, ज्यामुळे बाईकवरून प्रवास करतानाही मोबाईल फोन सहज चार्ज करता येतो.
टू-व्हीलर चालकांच्या मोबाइलमध्ये ‘हे’ 2 अॅप्स असलेच पाहिजे ! सुरक्षितता अजूनच वाढेल
होंडा शाईनमधील इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. त्यात लेटेस्ट OBD-2B नॉर्म्स जोडले गेले आहेत. पण इंजिन अपडेट केल्यानंतरही ते पूर्वीसारखेच पॉवर आणि टॉर्क प्रदान करते. ही बाईक 4-स्ट्रोक, SI, BS-VI इंजिनने सुसज्ज आहे, जी 7,500 आरपीएम वर 7.9 किलोवॅट पॉवर निर्माण करते आणि 6,000 आरपीएम वर 11 एनएम टॉर्क जनरेट करते.
होंडा शाईन 125 चे ARAI सर्टिफाइड मायलेज 55 किमी प्रति लिटर आहे. या बाईकमध्ये 10.5 लिटरचे फ्युएल टॅंक क्षमता आहे, त्यामुळे एकदा टाकी भरली की, ही बाईक सुमारे 575 किलोमीटर सहज चालवता येते. तर होंडा शाईन 100 मध्ये 10 लिटरचे फ्युएल टॅंक आहे, जी भरल्यावर 700 किमी पर्यंत सहज प्रवास करू शकते. परंतु, हा मायलेज रायडिंगची परिस्थिती, ट्रॅफिक आणि मेंटेनन्सवर अवलंबून असते.