
दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
अनेकदा गाडी चालवताना दुचाकीवर दोघांऐवजी तीन प्रवासी दिसून येता. जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात आणि दुचाकीवर ट्रिपल सीट चालवतात त्यांना मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक चालान जारी केले जाऊ शकते. यासाठी पोलिसांकडून किती दंडात्मक कारवाई होऊ शकते, ते जाणून घ्या…
मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ क अंतर्गत दंड आकारला जाऊ शकतो. दिल्ली वाहतूक पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीला ट्रिपल सीट घेऊन दुचाकी चालवताना पकडले गेले तर पहिल्या गुन्ह्यासाठी ₹१,००० चा दंड आकारला जातो. जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या चुकीपासून शिकले नाही आणि पुन्हा तीच चुक केली तर प्रत्येकी गुन्ह्यासाठी ₹१,००० चा दंड आकारला जाणार,अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःचे आणि रस्त्यावरील इतरांचे जीवन धोक्यात येऊ शकते. ट्रिपल सीट चालवल्याने स्कूटरचे संतुलन बिघडू शकते, म्हणून दोनपेक्षा जास्त लोकांसह दुचाकी चालवू नये असा सल्ला दिला जातो. असे केल्याने दोन नुकसान होऊ शकतात. पहिले, पोलिस तुम्हाला वाहतूक दंड आकारू शकतात आणि दुसरे दुचाकी स्वाराला दुखापत होऊ शकते.
वाहतूक दंडाबद्दल माहिती दिली आहे जर तुम्हाला दंड टाळायचा असेल तर अशा चुका टाळा आणि नेहमी वाहतूक नियमांचे पालन करा,असा सल्ला वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, जर तुम्ही पुढच्या वर्षी परवडणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सध्याच्या किमतीपेक्षा काही हजार रुपये जास्त मोजावे लागू शकतात. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, केंद्र सरकार पुढील वर्षापासून सर्व इंजिन क्षमता असलेल्या सर्व दुचाकी वाहनांमध्ये ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) अनिवार्य करणार आहे. यामुळे सध्या परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या बाईक आणि स्कूटरच्या किमती अचानक वाढू शकतात.
नवीन नियमानुसार, १ जानेवारी २०२६ पासून, सर्व दुचाकी उत्पादकांना त्यांचे सर्व ABS असलेले दुचाकी मॉडेल विकावे लागतील. सध्या, १२५ सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी वाहनांमध्येच ABS अनिवार्य आहे. तथापि, बाजारात काही १२५ सीसीच्या बाईक आहेत ज्या ABS सह देखील येत आहेत.