भारतीय ग्राहक होंडाच्या 'या' सेफ्टी फीचरच्या प्रेमात, ५०००० मॉडेल्सची विक्री; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत (फोटो सौजन्य-X)
होंडा इंडियाने एक मोठा टप्पा गाठला असून भारतात आता ५०,००० होंडा सेन्सिंग एडीएएस सुसज्ज कार धावताना दिसणार आहे. होंडाने मे २०२२ मध्ये सिटी ई:एचईव्ही सोबत भारतात पहिल्यांदा होंडा सेन्सिंग एडीएएस सादर केले. तेव्हापासून कंपनीने ADAS तंत्रज्ञानाचा सतत विस्तार केला आहे.
होंडा इंडियाने अनेक विभागांमध्ये ADAS तंत्रज्ञान सादर केले आहे. भारतात मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंटमध्ये ADAS सादर करणारी होंडा ही पहिली कंपनी होती. २०२३ मध्ये होंडा सिटीने त्याची सुरुवात होते. होंडा सिटी खरेदीदारांपैकी ९५ टक्के लोक ADAS-सुसज्ज प्रकार निवडतात. तर एलिव्हेटचे ६० टक्के आणि अमेझचे ३० टक्के खरेदीदार ADAS-सुसज्ज प्रकार निवडतात.
या टप्प्याबद्दल बोलताना, होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग आणि सेल्सचे उपाध्यक्ष कुणाल बहल यांनी सांगितले की, “होंडा कार्स इंडियामध्ये, सुरक्षितता ही आमच्या प्रत्येक कामाचा गाभा आहे. भारतीय रस्त्यांवर ५०,००० ADAS कारचा टप्पा गाठणे हे सर्वांसाठी सुरक्षितता वाढवण्याप्रती आमची अढळ वचनबद्धता दर्शवते.”
तसेच ADAS वैशिष्ट्यासह येणाऱ्या वाहनांची मागणी वाढत आहे. जेव्हा लोक गाडी खरेदी करायला जातात तेव्हा ते या वैशिष्ट्याचा नक्कीच उल्लेख करतात. ग्राहकांच्या सोयीसाठी कार कंपन्या देखील त्यांच्या वाहनांमध्ये हे वैशिष्ट्य प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ADAS म्हणेजच Advanced Driver Assistance System असे आहे. आता, त्याच्या नावाप्रमाणेच, हे वैशिष्ट्य ड्रायव्हरच्या सुरक्षिततेसाठी प्रदान करण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य बहुतेकदा उच्च बजेटच्या कारमध्ये दिसून येते.
परंतु नवीन सुरक्षा नियम लागू झाल्यापासून, कार कंपन्या कमी किमतीच्या कारमध्ये देखील ते प्रदान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे वैशिष्ट्य नवीनतम कार होंडा अमेझ २०२४ मध्ये देखील दिले आहे.
चालकाला सुरक्षित आणि आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी ही कार उपकरणे आणि सेन्सर वापरते. ADAS मुळे अपघातांची शक्यता कमी होते. गाडी चालवणे सोपे करण्यासाठी काम करते. हे वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचे आणि मदत करणाऱ्या वैशिष्ट्यांचे संयोजन आहे.
लेन कीपिंग असिस्ट सिस्टीम (LKAS): ही सिस्टीम ड्रायव्हरला रस्त्यावर एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरते.
एडीएस (ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग): एडीएस फीचर असलेल्या कारसमोर काही समस्या असल्यास, ड्रायव्हर त्यावर प्रक्रिया करत नाही, ही प्रणाली ब्रेक लावून कार आपोआप थांबवते.
टक्कर इशारा: टक्कर इशारा ड्रायव्हरला पुढे संभाव्य टक्कर बद्दल आधीच सूचित करतो.
ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन: ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन फीचर वाहनाच्या बाजूच्या आणि मागील बाजूस असलेल्या भागांना ओळखते जे चालकाच्या दृष्टीच्या बाहेर आहेत. ते अलर्टद्वारे सूचित करते.
क्रूझ कंट्रोल फीचर ड्रायव्हरला वेग निश्चित करण्यास आणि आवश्यक ते जलद बदल करण्यास मदत करते.
ADAS हे सुरक्षिततेचे एक नवीन मापदंड बनत आहे. याद्वारे चालक आणि प्रवाशांची सुरक्षितता अधिक सुनिश्चित केली जाते.