फोटो सौजन्य - Social Media
BMW मोटर्राड इंडियाने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय सेडान BMW 3 सीरीज लॉन्ग व्हीलबेस (LWB) चा फेसलिफ्ट मॉडेल अधिक आकर्षक फीचर्ससह लाँच केला आहे. ही जर्मन ऑटोमोबाईल कंपनीची भारतातील दुसरी राइट-हँड ड्राइव्ह लॉन्ग व्हीलबेस प्रीमियम सेडान आहे, जी खास भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. याआधी, गेल्या वर्षी जुलै महिन्यात 8th Generation BMW 5 सीरीज LWB लाँच करण्यात आली होती, जी भारतीय बाजारात चांगलीच लोकप्रिय ठरली.
सध्या BMW 3 सीरीज LWB केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असून, ती 330Li M स्पोर्ट व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही सेडान BMW आपल्या चेन्नई प्लांटमध्ये असेंबल करणार आहे, त्यामुळे भारतीय ग्राहकांना मेड-इन-इंडिया BMW सेडानचा अनुभव घेता येईल. सध्या या गाडीचा केवळ पेट्रोल व्हेरिएंट उपलब्ध असला तरी, अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीस डिझेल व्हेरिएंटदेखील बाजारात दाखल होऊ शकतो. त्यामुळे डिझेल गाड्यांच्या चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही, आणि त्यांनाही BMW 3 सीरीज LWB च्या शानदार परफॉर्मन्सचा अनुभव घेता येईल. BMW 3 सीरीज LWB मध्ये 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजी सोबत येते. या दमदार इंजिनमुळे ही कार फक्त 6.2 सेकंदात 0 ते 100 kmph वेग पकडू शकते. भारतीय बाजारात नवीन BMW 3 सीरीज LWBची थेट स्पर्धा ऑडी A6, वोल्वो S90 आणि नवीन जनरेशन मर्सिडीज-बेंझ E-क्लास सोबत होईल. या सर्व गाड्या एकाच सेगमेंटमध्ये येतात आणि त्यांच्यात फीचर्स व परफॉर्मन्सचा जबरदस्त सामना पाहायला मिळेल.
BMW 3 सीरीज LWB मध्ये काही विशेष गोष्टी आहेत, ज्या या गाड्यांमधील एक विशेष आकर्षण ठरले आहेत. मुळात, ही कार स्पोर्टी आणि लक्झरी डिजाईनमध्ये तयार केली आहे. जी लुकने फार आकर्षक आहे. तसेच या कारमध्ये राइट-हँड ड्राइव्ह मॉडेल देण्यात आले आहे. माइल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह दमदार इंजिन देण्यात आले असून गाडी 6.2 सेकंदात 0-100 kmph वेग गाठण्याची क्षमता ठेवते.
जर तुम्ही एक लक्झरी आणि हाय-परफॉर्मन्स सेडान शोधत असाल, तर BMW 3 सीरीज LWB एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचा वेग, डिझाईन आणि अत्याधुनिक टेक्नोलॉजी यामुळे ही कार ऑडी आणि मर्सिडीज सारख्या स्पर्धकांपेक्षा खास ठरते. डिझेल व्हेरिएंटसाठी डिसेंबर २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.