Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६

होंडा कंपनीने आपल्या अत्यंत अत्याधुनिक इलेक्ट्रिक संकल्पना मॉडेलने आणि एका नाविन्यपूर्ण जाहिरातपटाद्वारे जागतिक पातळीवरील सर्वोच्च डिझाइन पुरस्कारावर नाव कोरले आहे. या बहुमानामुळे दुचाकी जगतात होंडाच्या भविष्यातील तंत्रज्ञानाची आणि अनोख्या संकल्पनेची प्रचंड चर्चा रंगली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 20, 2026 | 02:45 PM
होंडा इलेक्ट्रिक मोटरसायकल बिझनेसचा डंका! EV कन्सेप्ट आणि ब्रँड फिल्मसाठी पटकावला रेड डॉट पुरस्कार २०२६
Follow Us
Follow Us:
  • होंडाच्या ‘EV Outlier Concept’ आणि ब्रँड फिल्मला जागतिक स्तरावर ‘रेड डॉट डिझाइन अवॉर्ड २०२६’ पुरस्कार मिळाला.
  • २०३० नंतरच्या दुचाकींची अनोखी झलक दाखवणाऱ्या या EV मॉडेलमध्ये दोन्ही चाकांमध्ये इन-व्हील मोटर्सचा वापर केला आहे.
  • होंडा R&D चे संचालक तोशिनोबू मिनामी यांनी हा विजय भविष्यातील गरजा ओळखून केलेल्या नाविन्यपूर्ण कामाचा गौरव असल्याचे म्हटले.

होंडा कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे अस म्हणायला हवं. होंडाच्या ‘EV Outlier Concept’ या इलेक्ट्रिक टू व्हीलर संकल्पनेने डिझाइन कन्सेप्ट प्रकारात, तर “What Is a Electric Motorcycles” या ब्रँड फिल्मने ब्रँड अँड कम्युनिकेशन डिझाइन प्रकारात जागतिक स्तरावर मानल्या जाणाऱ्या ‘रेड डॉट डिझाइन अवॉर्ड २०२६’ पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

EV आऊटलायर कन्सेप्ट

ही संकल्पना केवळ सध्याच्या गाड्यांची सुधारित आवृत्ती नसून २०३० नंतरच्या दुचाकींचे भविष्य दर्शवणारी एक नवीन दिशा आहे असे मानले जात आहे. जपान मोबिलिटी शो २०२५ मध्ये पहिल्यांदा सादर केलेल्या या मॉडेलमध्ये ‘प्रिसिजन ऑफ इंट्रिन्सिक डिझाइन’ या थीमचा वापर केला आहे. यात पुढील आणि मागील अशा दोन्ही चाकांमध्ये ‘इन-व्हील मोटर’ बसवल्यामुळे गाडीची रायडिंग पोझिशन अत्यंत खाली ठेवणे शक्य झाले आहे. स्मोक-क्लियर बॉडी आणि गुळगुळीत पृष्ठभागामुळे रायडरला वेगवान आणि हवेत तरंगल्यासारखाच जणू अनुभव मिळतो.

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

ब्रँड फिल्म काय होती?

होंडाच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल व्यवसायाचे ब्रीदवाक्य “Expected life. Unexpected discoveries.” असे आहे. या ब्रँड फिल्ममध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून मानवी जीवन अधिक सोपे, सुलभ आणि रोमांचक कसे बनवता येईल, याचे चित्रण केले आहे. तसेच भविष्यातील समाज आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे दाखवत नवीन जीवनशैलीचा मार्ग यात मांडण्यात आला आहे.

अॅमेझॉनवर १५००W फॅट-टायर ई-बाईक अवघ्या ४५,००० रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध!  जाणून घ्या सविस्तर माहिती

तोशिनोबू मिनामी (व्यवस्थापकीय संचालक, होंडा R&D) यांचे मनोगत

‘रेड डॉट हा जगातील सर्वात मानाचा डिझाइन पुरस्कार आहे आणि आमच्या डिझाइन संकल्पनेला तसेच ब्रँड फिल्मला हा बहुमान मिळणे अत्यंत अभिमानास्पद आहे. भविष्यातील गरजा ओळखून काळाच्या पुढे जाणाऱ्या तंत्रज्ञानाला आकार देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे. होंडा यापुढेही ग्राहकांना थक्क करणारे आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे उपक्रम राबवत राहील.’

Web Title: Honda wins red dot award 2026 ev outlier concept auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Honda Auto

संबंधित बातम्या

E3 ट्रायॉन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 99,999 रुपयांपासून, एका चार्जमध्ये 165 km रेंजचा दावा
1

E3 ट्रायॉन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 99,999 रुपयांपासून, एका चार्जमध्ये 165 km रेंजचा दावा

न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !
2

न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!
3

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून
4

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.