
एकच इंजिन, पण वेगळा वापर
दोन्ही मोटरसायकलमध्ये 293.5cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन CB300F मधील युनिटशी संबंधित असून 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले आहे. भारतीय मॉडेलमध्ये दक्षिण अमेरिकन XR300Lच्या तुलनेत एक्झॉस्ट रूटिंगमध्येही बदल करण्यात आला आहे.
Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
XR300Lला पारंपरिक ड्युअल-स्पोर्ट डिझाइन देण्यात आले आहे. स्लिम बॉडीवर्क, उंच फ्रंट मडगार्ड, वरच्या बाजूला असलेला एक्झॉस्ट आणि अरुंद टेल सेक्शनमुळे ती ऑफ-रोड रायडिंगसाठी तयार दिसते. पुढे लॉन्ग-ट्रॅव्हल टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे गॅस-चार्ज्ड Pro-Link मोनोशॉक मिळतो. 21-इंच फ्रंट आणि 18-इंच रिअर स्पोक व्हील्ससह दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. स्विचेबल ड्युअल-चॅनेल ABSही मिळतो.
XR300 Rally मध्ये जास्त टूरिंग फोकस
XR300 Rally ही XR300Lपेक्षा जास्त टूरिंग-केंद्रित आहे. यात मोठे फ्रंट फेअरिंग, उंच विंडस्क्रीन, नकल गार्ड्स आणि 13-लिटर फ्युल टँक देण्यात आला आहे. कॉकपिटमध्ये 5-इंच TFT डिस्प्ले असून Honda RoadSyncद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते. ट्रॅक्शन कंट्रोल आणि स्विचेबल ABSही देण्यात आले आहेत.
होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
XR300Lमध्ये 7.8-लिटर फ्युल टँक, 830 mm सीट हाइट आणि 244 mm ग्राउंड क्लीयरन्स आहे. सस्पेन्शन ट्रॅव्हल 260 mm असून 256 mm फ्रंट आणि 220 mm रिअर डिस्क ब्रेक मिळतात. दुसरीकडे, Rallyची मोठी टाकी आणि विंड प्रोटेक्शन लांब प्रवासासाठी उपयोगी ठरते.
XR300Lचा थेट सामना Hero Xpulse 210 आणि Kawasaki KLX230सारख्या हलक्या ऑफ-रोड बाइक्सशी होणार आहे. तर Rally मॉडेल अॅडव्हेंचर टूरिंगकडे झुकते. होंडाने दोन्ही बाइक्सच्या किमतीत 25,000 रुपयांचा फरक ठेवला आहे.