
E3 ट्रायॉनचे 3 व्हेरिएंट आणि रेंज
ट्रायॉन C1 हा एंट्री-लेव्हल व्हेरिएंट असून त्याची किंमत 99,999 रुपये आहे. यात 2.3 kWh बॅटरी मिळते आणि कंपनीने 108 km IDC रेंजचा दावा केला आहे. या व्हेरिएंटचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची बॅटरी काढून वेगळी चार्ज करता येते. त्यामुळे पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट नसलेल्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांसाठी हा ऑप्शन उपयोगी ठरू शकतो.
फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
ट्रायॉन C1x ची किंमत 1,09,999 रुपये आहे. यात 3.0 kWh बॅटरी असून कंपनीच्या दाव्यानुसार 165 km IDC रेंज मिळते. जास्त रेंज हवी असलेल्या कस्टमर्ससाठी हा व्हेरिएंट लक्षवेधी आहे. तर ट्रायॉन C2 ची किंमत 1,19,999 रुपये असून यातही 3.0 kWh बॅटरी मिळते. हा व्हेरिएंट जास्त परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करतो आणि त्याची दावा केलेली रेंज 128 km आहे.
फीचर्स आणि रनिंग कॉस्ट
या तिन्ही व्हेरिएंटमध्ये 14-इंच व्हील्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि एर्गोराइड सीट देण्यात आली आहे. कंपनी हब मोटरसह स्वतःच्या RotoRing डिझाइनचा वापर करते. यामुळे व्हायब्रेशन कमी होण्यास आणि सर्व्हिसिंग सुलभ होण्यास मदत होते, असा कंपनीचा दावा आहे.
कंपनीच्या कॅल्क्युलेटरनुसार, स्कूटरचा ऊर्जा वापर 28 Wh/km असून विजेचा दर 9 रुपये प्रति युनिट गृहीत धरला आहे. हा कंपनीने मांडलेला अंदाज आहे; प्रत्यक्ष खर्च वीजदर आणि रायडिंगच्या पद्धतीनुसार बदलू शकतो.
लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
वॉरंटी आणि बुकिंगपूर्वी लक्षात घ्या
कंपनीच्या प्रॉडक्ट पेजवर बॅटरीसाठी अटींसह 8 वर्षांपर्यंत वॉरंटीचा उल्लेख आहे. पण स्वतंत्र वॉरंटी पॉलिसीनुसार बॅटरीसाठी 5 वर्षे किंवा 75,000 km आणि प्रमुख पार्ट्ससाठी 3 वर्षे किंवा 50,000 km अशी मर्यादा दिली आहे. त्यामुळे एक्स्टेंडेड वॉरंटीच्या अटी लेखी स्वरूपात तपासणे महत्त्वाचे आहे.
सध्या कंपनीचे अनुभव केंद्र बंगळुरूमधील कोरमंगळा येथे आहे. हैदराबाद, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली येथे केंद्रे लवकरच सुरू होणार असल्याचे वेबसाइटवर नमूद आहे. बुकिंगपूर्वी डिलिव्हरीची तारीख आणि रिफंडच्या अटीही लेखी तपासाव्यात, कारण कंपनीच्या FAQ आणि सेवा अटींमध्ये रिफंडबाबत वेगवेगळे उल्लेख आहेत. तसेच दिलेली रेंज ही IDC चाचणीवर आधारित आहे; प्रत्यक्ष रेंज वेग, वजन आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार कमी-जास्त होऊ शकते.