फोटो सौजन्य: @abdoulmansoor00 (X.com)
जरी भारतात बजेट फ्रेंडली कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी लक्झरी कार्सची क्रेझ काही कमी नाही. आजही रस्त्यांवर एखादी लक्झरी कार धावताना दिसली की अनेकांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. याव्यतिरिक्त देशातील अनेक राजकीय आणि सेलिब्रेटी मंडळींकडे सुद्धा लक्झरी कार्स पाहायला मिळते. यातही अनेक जण रेंज रोव्हरच्या कार्स मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात.
भारतीय बाजारपेठेत लँड रोव्हर रेंज रोव्हरची एक वेगळीच क्रेझ नेहमीच दिसून येते. कंपनीच्या अनेक कार्स लोकप्रिय आहेत. रेंज रोव्हर वेलार ही 5-सीटर लक्झरी एसयूव्ही आहे, जी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंतमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.01 कोटी रुपये आहे आणि डिझेल व्हेरियंटची किंमत तब्बल 1.03 कोटी रुपये आहे. याचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल डायनॅमिक एचएसई (पेट्रोल) आहे.
Hyundai कडून ड्युअल सिलेंडर असणारी सर्वात स्वस्त CNG एसयूव्ही लाँच
जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर पूर्ण पैसे देण्याऐवजी तुम्ही ती लोनवर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला किती आणि डाउन पेमेंट आणि EMI भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
रेंज रोव्हर वेलारचा पेट्रोल व्हेरियंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 91.12 लाख रुपयांचे लोन मिळू शकते. या लोनवर व्याज म्हणजेच इंटरेस्ट आकारले जाईल. या व्याजानुसार, दरमहा एक निश्चित रक्कम ईएमआयच्या स्वरूपात तुम्हाला जमा करावी लागेल.
रेंज रोव्हरचे हे मॉडेल खरेदी करण्यासाठी 10.13 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. या डाउन पेमेंट व्यतिरिक्त, उर्वरित रक्कम दरमहा ईएमआयच्या स्वरूपात जमा केली जाईल. जर तुम्ही वेलार खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी लोन घेतले आणि या कर्जाचा व्याजदर 9 टक्के असेल, तर दरमहा 2.27 लाख रुपयांचा ईएमआय बँकेत जमा होईल.
Hyundai Creta च्या EX व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
जर ही लक्झरी एसयूव्ही खरेदी करण्यासाठी पाच वर्षांसाठी कर्ज घेतले असेल, तर दरमहा 9 टक्के व्याजदराने 1.89 लाख रुपये ईएमआय जमा करावे लागेल. रेंज रोव्हर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला सहा वर्षांसाठी 1.64 लाख रुपयांचे लोन घ्यावे लागेल आणि ते दरमहा 9 टक्के व्याजदराने जमा करावे लागेल. ही लँड रोव्हर कार खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही सात वर्षांसाठी लोन घेतले आणि या कर्जाचा व्याजदर 9 टक्के असेल, तर तुम्हाला दरमहा 1.47 लाख रुपयांचा ईएमआय जमा करावा लागेल. बँकांच्या वेगवेगळ्या धोरणांनुसार, या लोनच्या रक्कमेत काही फरक दिसून येण्याची शक्यता आहे. यासाठी लोन घेताना बँकेचे डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.