फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. या कंपन्या भारतीय ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार्स उत्पादित करत असतात. मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून ह्युंदाई बेस्ट कार्स ऑफर करत आहे. आता देखील कंपनीने सीएनजी सेगमेंटमध्ये एक नवीन व्हेरियंट लाँच केले आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाने त्यांच्या लोकप्रिय आणि सर्वात परवडणाऱ्या एसयूव्ही एक्सटर सीएनजीचा एक नवीन स्वस्त व्हेरियंट लाँच केला आहे. एक्स्टर हाय-सीएनजी आता एंट्री-लेव्हल एक्स व्हेरियंटसह उपलब्ध आहे. या नवीन व्हेरियंटची सुरुवातीची किंमत 7.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी, एक्सटिरिअर सीएनजी मिड-स्पेक एस, एसएक्स आणि एससी नाईट व्हर्जन्ससह देण्यात आले होते. नवीन EX ट्रिमनंतर, एक्सटीरियर हाय-सीएनजी आता 1 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. यामुळे नक्कीच या कारच्या मागणीत वाढ होईल अशी आशा आहे.
Hyundai Creta च्या EX व्हेरियंटला घरी आणण्यासाठी 2 लाखाचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
लूक आणि डिझाइनच्या बाबतीत, ही कार नियमित एक्सटीरियर एसयूव्हीसारखीच आहे. यामध्ये कंपनीने ड्युअल-सिलेंडर टेक्नॉलिजीचा वापर केला आहे. म्हणजे या कारमध्ये दोन स्वतंत्र लहान सीएनजी टँक्स आहेत. जे कारच्या बूटखाली म्हणजेच ट्रंकखाली बसवले आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही सीएनजी कार असूनही, तुम्हाला कारमधील बूट स्पेसशी तडजोड करावी लागणार नाही.
एक्स्टर सीएनजीमध्ये, कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 69hp ची पॉवर आणि 95.2Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की यात 60 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. ही सीएनजी एसयूव्ही 27.1 किमी/किलो पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.
एंट्री लेव्हल मॉडेल म्हणून, ही सीएनजी एसयूव्ही इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (ईबीडी) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), थ्री-पॉइंट सीट बेल्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, एच-आकाराचे एलईडी टेललॅम्प, बॉडी कलर बंपर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, अॅडजस्टेबल रिअर हेडरेस्ट, रिअर पार्किंग सेन्सर आणि मॅन्युअल एअर कंडिशन (एसी) यासारख्या फीचर्ससह येते.
बजेट 1 लाख रुपये आणि त्यात स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘हे’ आहेत बेस्ट ऑप्शन्स
भारतीय बाजारात, ही सीएनजी एसयूव्ही टाटा पंच आणि मारुती सुझुकी फ्रँक्सशी स्पर्धा करते. या दोन्ही एसयूव्ही सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहेत. टाटा मोटर्स ही देशातील पहिली कंपनी होती जी सीएनजी कारमध्ये ड्युअल-सिलेंडर तंत्रज्ञान वापरले होते.