हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे (फोटो -यूट्यूब)
चिपळूणमध्ये चारुदत्त आफळे उलगडणार ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’
कीर्तनमाला १२ जानेवारीपासून सुरू
श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी
चिपळूण: आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे नेटके संयोजन, यामुळे चिपळूणवासिय रसिकांना दरवर्षी ओढ लावणारी कीर्तनमाला १२ जानेवारी पासून सुरु होत आहे. यंदाच्या दशकपूर्ती कीर्तनमालेत राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप श्री. चारूदत्तबुवा आफळे पेशवाईचा सुवर्णकाळ उलगडणार आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी कालावधीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात संपन्न होणारी ही कीर्तनमाला दरवर्षी प्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असुन प्रेक्षागृहातील पहिल्या काही आसन रांगा निमंत्रित व आयोजक परिवारासाठी राखीव असणार आहेत. गेली नऊ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली यंदाची कीर्तनमाला दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या कालावधीत संपन्न होणार आहे.
कीर्तनमालेचे उदघाटन सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आफळेबुवां यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची नेटकी साथ असते यावर्षी सहकारी कलावंत म्हणून तबला साथ मिलिंद तायवाडे पखवाज साथ मनोज भांडवलकर व ऑर्गन साथ चिंतामणी निमकर करणार आहेत.
श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी
दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा जागर रसिकांसाठी पर्वणी असते. विषयाला रखजैसे रंगमंच नेपथ्य अनुरूप असणारी वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रदेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे स्मरणीय ठरत आली आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची अत्य काळाची कारकीर्द दैदिप्यमान कशी होती ? आनंदीबाई पेशवा वांचा खरा इतिहास काय?
चिपळूण बापट आली येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरुमाऊली सद्गुरू वासुदेव दळवी काका महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या या कीर्तनमालेत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचे पैलू, राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती ह.भ.प. श्री. चारूदत्तबुवा आफळे आपल्या अभ्क्रसपूर्ण विवेचन व सुश्राव्य सादरीकरणातून उलगडत असतात.
इंदिरा गाधी सास्कृतिक केंद्र येथील जागेची मर्यादा लक्षात घेऊन रसिकांनी विनामूल्य प्रवेश आसन रामा व्यवस्थेचा लाभ घेण्याचे दृष्टीने कार्यक्रमाचे नियोजित वेळेत उपस्थित रहये असे आवाहन आयोजक श्री स्वामी चैतन्य परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






