(फोटो सौजन्य-AI एआय)
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हुंदाई मोटर इंडियाने ऑगस्ट २०२६ या महिन्यासाठी आपल्या प्रमुख गाड्यांच्या श्रेणीवर आकर्षक ऑफर्स आणि सवलतींची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध मॉडेल्सवर रोख सूट, जीएसटीमधील कपात आणि इतर फायद्यांसह एकूण ८५,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळत आहेत. याशिवाय, १५ ऑगस्ट २०२६ पूर्वी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना मूळ ऑफरव्यतिरिक्त १५,००० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे.
कंपनीने या महिनाभरात खरेदी सुलभ करण्यासाठी फायनान्स क्षेत्राशी संबंधित अनेक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये १००% ऑन-रोड फंडिंग, प्रोसेसिंग फीवर ५०% पर्यंत सूट, आणि फोरक्लोजर शुल्कावर १००% सवलत समाविष्ट आहे.
मॉडेलनुसार मिळणारे प्रमुख फायदे:
हे सर्व ऑफर्स ऑगस्ट २०२६ या महिन्यापुरतेच मर्यादित असून कंपनीच्या नियम व अटींनुसार लागू होतील. गाड्यांचे व्हेरियंट, इंधन प्रकार (पेट्रोल/डिझेल) आणि शहरांनुसार सवलतींची नक्की रक्कम बदलू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या जवळच्या अधिकृत हुंदाई डीलरशिपला भेट देऊन अचूक माहिती मिळवण्याचा सल्ला दिला आहे.






