फोटो सौजन्य: capitalhyundai.co.in
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे ह्युंदाई. या कंपनीने आतापर्यंत मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार कंपनी नेहमीच बेस्ट कार ऑफर करण्याचा प्रयत्न करत असते. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी बेस्ट ऑफर्स सुद्धा देत असते. आता देखील एप्रिल 2025 मध्ये कंपनी Hyundai Venue वर आकर्षक ऑफर देत आहे.
भारतीय कार बाजारात एप्रिल 2025 मध्ये Hyundai कंपनीने त्यांच्या लोकप्रिय SUV मॉडेल Venue वर आकर्षक सूट जाहीर केली आहे. या महिन्यात Hyundai Venue वर ग्राहकांना 70,000 पर्यंतच्या सवलती मिळू शकतात, ज्यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.
काय कार आहे बॉस ! सनरूफ, 6 एअरबॅग, आणि 5 – स्टार सेफ्टी, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
या ऑफरअंतर्गत Hyundai Venue ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7,94,100 पासून सुरू होते. ही सवलत 30 एप्रिल 2025 पर्यंत लागू आहे. मात्र, ह्युंदाई 20 एप्रिलपासून आपल्या कारच्या किमती 3% पर्यंत वाढवणार असल्याने, ही मर्यादित काळासाठीची ऑफर ग्राहकांसाठी एक उत्तम संधी ठरू शकते.
डिस्काउंटसह मिळणाऱ्या Venue व्हेरियंटमध्ये 1.2 लिटर Kappa पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. टेक्नॉलजी आणि आरामाच्या दृष्टीने ही SUV खूपच अपग्रेडेड आहे. यामध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले सपोर्टसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.
BMW च्या ‘या’ दोन बाईक्स मार्केटमध्ये टोटल बंद ! 7 वर्षाचा प्रवास संपला, पण नेमकं कारण काय?
सुरक्षिततेच्या दृष्टीने, Hyundai Venue मध्ये 6 एअरबॅग्ज, TPMS हायलाइन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), ऑटो हेडलॅम्प आणि रिअर कॅमेरा यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये दिली आहेत. यासोबतच, रंगीत TFT मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले (MID) आणि पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील कारमध्ये उपलब्ध आहे, जे चालवताना अधिक स्पष्ट व अचूक माहिती देते.
Hyundai Venue ची एक्स-शोरूम किंमत 9,99,900 पर्यंत जाते. आपल्या सेगमेंटमध्ये ही SUV टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि किआ सोनेट यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देते. फीचर्स, किमतीचा लाभ आणि आकर्षक ऑफर्समुळे Hyundai Venue सध्या SUV खरेदीसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.