फोटो सौैजन्य: @carswithgreg (X.com)
आपली स्वतःची कार खरेदी करणं, हा कुठल्याही मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी एक सुखद आणि आनंदाचा क्षण असतो. तसेच काही जणांचे तर ड्रीम कार खरेदी करण्याचे स्वप्न असते, जे सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र झटत असतात.
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. त्यात एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसत आहे. या सगळ्यात टोयोटा फॉर्च्युनरची एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच ही कार आवडणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.
Toyota Fortuner ही 7 सीटर कार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 33 लाख 78 हजार रुपयांपासून सुरू होते. टोयोटाची ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्याचे सर्वात स्वस्त मॉडेल ४*२ पेट्रोल व्हेरियंट आहे.अनेक जण ही कार लोनवर खरेदी करताना दिसतात. जर तुम्ही ही 7 सीटर टोयोटा कार लोनवर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर ही कार फक्त 50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केली तर याचा EMI किती असेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
भारतात लवकरच लाँच होणार 2025 Hyundai Ioniq 5, मिळणार अनेक हाय-फाय फीचर्स
कारच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत 39.32 लाख रुपये आहे. ही कार लोनवर खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 38 लाख 82 हजार रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल.
जर तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी पाच वर्षांसाठी लोन घेतले आणि बँक या लोनवर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा तब्बल 80,584 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. याशिवाय, जर फॉर्च्युनर खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी कर्ज घेतले तर दरमहा सुमारे 96,604 रुपये बँकेत जमा करावे लागतील. जर तुम्ही सहा वर्षांसाठी कर्ज घेतले तर 9% व्याजदराने ईएमआय 69,976 रुपये असेल, तर सात वर्षांसाठी हा ईएमआय 62,458 रुपये असेल.
डोंगराळ भागात कार चालवताना Hill Hold Control फिचर कसे काम करते? सुरक्षित राइडसाठी महत्वाचा आहे फिचर
टोयोटा फॉर्च्युनर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनसह येते. ही कार 2694 सीसी, डीओएचसी, ड्युअल व्हीव्हीटी-आय इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 166 पीएस पॉवर आणि 245 एनएम टॉर्क जनरेट करते.
या कारमध्ये 2755 सीसी डिझेल इंजिनचा पर्याय देखील समाविष्ट आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेले हे इंजिन 204 पीएस पॉवर आणि 420 एनएम टॉर्क निर्माण करते. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये पॉवर फक्त 204 पीएस इतकी मिळते. पण जनरेट होणारा टॉर्क 500 NM आहे.