फोटो सौजन्य: Pinterest
राज्यात ज्याप्रमाणे वाहनांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या चोरीची घटना देखील समोर येत आहे. अशातच वाहनांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. हा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य असणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर अनेक वाहन मालकांची तारांबळ उडाली होती. त्यात राज्य सरकारने HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल ठेवली होती. पण राज्यातील नागरिकांना दिलासा देत सरकारने ही नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 केली आहे. यातच अजून एक दिलासादायक माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Ertiga किंवा Innova खरेदी करण्यात नका करू घाई ! May 2025 मध्ये ‘ही’ 7 सीटर कार करणार धमाका
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) तयार करणारे उत्पादक आता वाहनधारकांच्या निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणीही पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना किंवा सोसायट्यांमध्ये शिबिरे आयोजित करून ही सेवा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. जर एखाद्या ठिकाणी किमान 25 किंवा त्यापेक्षा अधिक वाहनधारकांनी एकत्रितपणे बुकिंग केले, तर निवासस्थान, व्यवसायस्थळ किंवा सोसायटीमध्ये एचएसआरपी नंबर प्लेट कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता बसविल्या जातील.
राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता शुल्क ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. ही नंबर प्लेट बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे.
हिट नाही तर सुपरहिट आहे ‘ही’ कार, परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना सोडेल मागे
दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये, तर हलकी वाहने, प्रवासी कार, मध्यम आणि जड वाहनांसाठी 745 रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे. या निश्चित शुल्काशिवाय कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, काही फिटमेंट केंद्रांवर जुन्या नंबर प्लेट्स काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी 022-20826498 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.