Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरातील युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? जाणून घ्या

आखाती देशांच्या मध्ये आणि संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या भागात चाललेल्या तणावपूर्वक संबंधामुळे, युद्धांमुळे व्यवसायांवर उद्योगांवर बऱ्याच प्रकारची बंधने आणि अडचणी लादल्या गेल्या आहेत. भारताचा ऑटोमोबाईल उद्योगही यासाठी अपवाद नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 07, 2026 | 03:46 PM
जगभरातील युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

जागतिक पटलावर सध्याची स्थिती उद्योगांसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायांसाठी थोडी जिकिरीची आहे म्हणायला हरकत नाही. आखाती देशांच्या मध्ये आणि संपूर्ण जगाच्या वेगवेगळ्या भागात चाललेल्या तणावपूर्वक संबंधामुळे, युद्धांमुळे व्यवसायांवर उद्योगांवर बऱ्याच प्रकारची बंधने आणि अडचणी लादल्या गेल्या आहेत. भारताचा ऑटोमोबाईल उद्योगही यासाठी अपवाद नाही. विशेषतः कच्च्या तेलांच्या किंमती, वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची वाहतूक आणि एकंदरीत जागतिक पुरवठा साखळी ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो यावर याचा थेट परिणाम होत आहे.

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के तेल आयात करतो. यातील मोठा हिस्सा मध्यपूर्वेतील म्हणजे आखाती देशांकडून येतो. अलीकडील देशांतर्गत असणाऱ्या  तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या परिसरातील जहाजवाहतुकीवर दबाव निर्माण झाला होता. परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 95 ते 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत.

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प …

इंधनाच्या वाढत्या किंमतींचा थेट परिणाम वाहनांच्या वापरावर आणि विक्रीवर होतो. पेट्रोल व डिझेल महाग झाल्यास ग्राहक नवीन वाहन खरेदीचे निर्णय पुढे ढकलतात. विशेषतः एसयूव्ही, व्यावसायिक वाहने आणि मोठ्या इंजिनांच्या वाहनांच्या विक्रीवर याचा परिणाम होतो.

वाहन उद्योगासाठी आणखी एक मोठे आव्हान म्हणजे सुट्या भागांची वाहतूक. भारतातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रॉनिक चिप्स, सेन्सर्स, वायरिंग हार्नेस आणि इतर महत्त्वाचे घटक आशिया, युरोप व मध्यपूर्व देशांच्या मार्गांद्वारे आयात करतात. लाल समुद्र आणि मध्यपूर्वेतील समुद्री मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मालवाहतूक खर्च आणि वेळ दोन्ही वाढले आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय, जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेमुळे वाहन उत्पादकांना अतिरिक्त साठा ठेवावा लागत आहे. यामुळे कार्यकारी खर्च वाढतो. अनेक कंपन्या आता पर्यायी पुरवठादार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय रिफायनरी कंपन्यांनाही विविध प्रकारचे कच्चे तेल वापरण्यासाठी त्यांच्या प्रक्रियांमध्ये बदल करावे लागत आहेत, जे इंधन बाजारातील अस्थिरतेचे संकेत आहेत.

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो …

वाहतूक क्षेत्रावरही या परिस्थितीचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. इंधन महागल्यामुळे ट्रक, बस आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांचे ऑपरेटिंग खर्च वाढतात. परिणामी वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आणि तयार वाहनांची वाहतूक अधिक महाग होते. जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जा खर्चामुळे अनेक उद्योगांवर दबाव निर्माण झाला असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय संस्थांनी नमूद केले आहे.

एकूणच, आखाती देशांती आणि जगात चाललेल्या युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल उद्योगावर बहुअंगी  परिणाम होत आहे. इंधन दरवाढ, सुटे ऑटो पार्टस पुरवठ्यातील अडथळे, वाढलेले वाहतूक खर्च आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यामुळे उद्योगासमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत.

Web Title: Impact of war on indian automobile sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • automobile
  • transport
  • War

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.