Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इथेनॉल मिसळूनही पेट्रोल स्वस्त का मिळत नाही? जाणून घ्या याचं सविस्तर कारण

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळूनही दर कमी न होण्यामागे इथेनॉलची ठरवलेली खरेदी किंमत, केंद्र व राज्य सरकारचा मोठा कर आणि स्वतंत्र वाहतूक व साठवणुकीचा खर्च ही प्रमुख कारणे आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश पेट्रोल स्वस्त करणे नसून, परकीय चलनाची बचत, शेतीला पाठबळ आणि प्रदूषण कमी करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे हा आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 26, 2026 | 03:23 PM
इथेनॉल मिसळूनही पेट्रोल स्वस्त का मिळत नाही? जाणून घ्या याचं सविस्तर कारण
Follow Us
Follow Us:
  • इथेनॉलची खरेदी किंमत आणि वाहतूक साठवणुकीवरील खर्चामुळे मूळ बचत मर्यादित राहते.
  • पेट्रोलवरील केंद्र व राज्य सरकारचे मोठे कर किरकोळ दरांमध्ये घट होऊ देत नाहीत.
  • योजनेचा मुख्य उद्देश दर कपात नसून आयात खर्च व कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीतून हे जगजाहिर झाले होते कि पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळल्याने सरकारला मोठ्या हजारो करोड रुपयांचा फायदा होतो. आणि त्याबरोबरच प्रदूषणातही घट व्हायला मदत होते. त्यांच्या या वक्तव्यावरून तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल कि जर खरोखरच सरकारला इथेनॉल मिश्रणामुळे सरकारच्या खजिन्यात एवढी भर पडत आहे; तर पेट्रोलचे दर आधीपेक्षा कमी का होत नाहीयेत. शिवाय इथेनॉल देशातल्या देशात बनत असल्याने त्यावर आयात शुल्कही लागत नाही.

सामान्यतः इथेनॉलची निर्मिती वनस्पती व धान्यापासून होत असल्याने, हे इंधन उपलब्ध झाल्यावर पेट्रोलचे किरकोळ दर कमी होतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर दर कमी होताना दिसत नाहीत. यामागील प्रमुख आर्थिक व तांत्रिक कारणे काही अशाप्रमाणे आहेत,

इथेनॉलची खरेदी किंमत

इथेनॉल प्रामुख्याने ऊस, साखर, मका आणि खराब झालेल्या धान्यापासून तयार केले जाते. शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी सरकार इथेनॉलचे खरेदी दर निश्चित करते. त्यामुळे शुद्ध पेट्रोलच्या कराच्या आधीच्या मूळ किमतीशी तुलना केल्यास, इथेनॉलचा खरेदी दर फारसा कमी नसतो.

इथेनॉल पेट्रोल मध्ये चालतं, मग डिझेल मध्ये का नाही? हे आहे कारण! समजून घ्या एका क्लिकवर

करांचा मोठा वाटा

पेट्रोलच्या किरकोळ विक्री दरामध्ये केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचा व्हॅट यांचा खूप मोठा वाटा असतो. पेट्रोलमध्ये १०% किंवा २०% इथेनॉल मिसळले तरी या कररचनेत कोणताही बदल केला जात नाही. परिणामी, मिश्रणामुळे होणारी किरकोळ बचत करांच्या रचनेत विलीन होते.

वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च

इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे पेट्रोल आणि इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी तेल कंपन्यांना विशेष स्टोरेज कंटेनर, सुरक्षित वाहतूक आणि स्वतंत्र ब्लेंडिंग युनिट्स उभारावे लागतात. या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च इंधनाच्या एकूण खर्चात भर घालतो.

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे

मायलेजमध्ये होणारी घट

इथेनॉलची ऊर्जा घनता शुद्ध पेट्रोलपेक्षा सुमारे ३०% कमी असते. त्यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढल्यास वाहनाचे मायलेज थोडे कमी होण्याची शक्यता असते. जरी किंमत थोडी कमी झाली असती, तरी मायलेज कमी झाल्यामुळे ग्राहकांचा प्रत्यक्ष प्रवास खर्च तोच राहिला असता.

योजनेचा मूळ उद्देश

इथेनॉल ब्लेंडिंगचा मुख्य हेतू इंधन स्वस्त करणे नसून, भारताची आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलावरील आयात कमी करणे हा आहे. असे सरकारचे धोरण दिसून येते. यामुळे देशाचे अब्जावधी डॉलरचे परकीय चलन वाचते, शेती क्षेत्राला गती मिळते आणि त्याचबरोबरवाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होते.

इथेनॉल मिश्रणाचा थेट आर्थिक फायदा ग्राहकांच्या खिशापर्यंत पोहोचत नसला, तरी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात याचा मोठा वाटा आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे भाव आणि देशातील कररचना बदलत नाही, तोपर्यंत पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे निदर्शनास येतेय.

Web Title: Why petrol prices not decreasing despite ethanol blending reasons automobile sector marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • automobile
  • petrol rates

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.