फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते तेव्हा समजते की कार विकत घेणे सोपे असते पण तिला सांभाळणे कठीण. त्यातही कार म्हणजे प्रत्येकांसाठी जीवाचा तुकडा असतो. या जीवाच्या तुकड्याला जेव्हा स्क्रॅच किंवा डेन्ट लागतो, तेव्हा अनेक कार मालकांचा जीव कासावीस होतो. त्यामुळेच कित्येक जण आपल्या कारला पीपीएफ कोटिंग करताना दिसतात.
जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा ती साहजिकच एक मोठी गुंतवणूक असते. अशा परिस्थितीत, तुम्ही कारला नवीन स्थितीत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करता.
Year Ender 2024: ‘या’ आहेत 2024 मधील Fastest Cars, फक्त काही सेकंदातच पकडतातत 0-100 km/h ची स्पीड
आजकाल, मेट्रो शहरांमध्ये वाहनावर डेंट्स आणि ओरखडे येणे अगदी सामान्य झाले आहे, ज्याचा सामना एक दिवस तुमच्या वाहनाला देखील होऊ शकतो, अशा परिस्थितीत, बाजारात एक विशेष प्रकारची रॅपिंग सेवा उपलब्ध आहे ज्याला पीपीएफ (PPF) म्हणतात. पेंट प्रोटेक्शन फिल्म असा पीपीएफचा फुल फॉर्म आहे. ही पीपीएफ कोटिंग कारवर केल्यास तुम्ही तुमच्या कारचे अधिक प्रमाणात संरक्षण करू शकतात. पण अनेक जण याबाबत संभ्रमात असतात की ही कोटिंग करणे खरंच गरजेचे आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.
स्क्रॅच प्रोटेक्शन: PPF ही एक पातळ फिल्म आहे जी कारच्या पेंटवर लावली जाते. हे पेंटचे लहान स्क्रॅच, धूळ, कीटक आणि पक्ष्यांच्या वेस्टपासून संरक्षण करते.
कलर प्रोटेक्शन: ही फिल्म यूव्ही किरणांपासून देखील संरक्षण करते, ज्यामुळे कारचा रंग फिका पडत नाही.
पुनर्विक्रीची किंमत: चांगल्या स्थितीत ठेवलेल्या कारची पुनर्विक्रीची किंमत जास्त असते. PPF कारला नवीन दिसण्यास मदत करते.
केमिकल्सपासून संरक्षण: ही फिल्म कार पेंटला ॲसिड पावसापासून आणि इतर रसायनांपासून देखील संरक्षण करते.
Year Ender 2024: यंदाच्या वर्षात Electric Segment मध्ये लाँच झाल्या ‘या’ बाईक्स आणि स्कूटर
महाग: PPF सेट करणे खूप महाग असू शकते. त्याची किंमत कारच्या मॉडेल आणि आकारावर अवलंबून असते. यामुळे तुमच्या खिश्याला जास्त कात्री बसू शकते.
गुणवत्ता: सर्व PPF सारखे नसतात. खराब दर्जाची फिल्म कालांतराने पिवळी होऊ शकते किंवा निघू शकते.
पीपीएफ लावणे हा निर्णय पूर्णपणे तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून असते. तुम्हाला तुमची कार नवीनसारखीच चांगली ठेवायची असेल आणि स्क्रॅचपासून वाचवायची असेल, तर PPF हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु जर तुम्ही बजेटमध्ये असाल तर तुम्ही वॅक्सिंग किंवा सिरेमिक कोटिंग सारख्या इतर पर्यायांचा विचार करू शकता.