Year Ender 2024: यंदाच्या वर्षात Electric Segment मध्ये लाँच झाल्या या बाईक्स आणि स्कूटर
भारतात या वर्षी अनेक उत्तम इलेक्ट्रिक वाहनं लाँच झाली आहे. यात इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरचा देखील समावेश आहे. या नवीन ई-बाईक्स आणि स्कूटरला ग्राहकांकडून देखील सकारत्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आता भारतीय मार्केटमध्ये या वाहनांची क्रेझ वाढताना दिसत आहे. कित्येक जण आता पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा ई व्हेईकलला जास्त प्राधान्य देत आहेत. हीच मागणी लक्षात घेता, आता अनेक ऑटो कंपन्या खास इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. चला आज आपण 2024 मधील बेस्ट ई बाईक्स आणि स्कूटरबद्दल जाणून घेऊया.
नुकतेच बजाज चेतकचे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच झाले आहे. ही स्कूटर दोन व्हेरियंटमध्ये आणण्यात आली आहे. हे 3501, 3502 आणि 3503 या तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. आत्तापर्यंत, त्याच्या टॉप-स्पेक चेतक 3501 ची किंमत 1.27 लाख रुपये आहे आणि मिड-स्पेक 3502 ची किंमत 1.20 लाख रुपये आहे. यामध्ये बसवलेली बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर ही स्कूटर 153 किमीपर्यंतची रेंज देते. या स्कूटरची किंमत 1.20 ते 1.27 लाखांपर्यंत जाऊ शकते.
2025 मध्ये भारतात ‘या’ इलेक्ट्रिक कार्स घालणार धुमाकूळ, ग्राहक आतापासूनच बुक करण्यासाठी आहेत तयार
iQube बेस व्हेरियंट: हे स्कूटरचे बेस व्हेरियंट किफायतशीर आहे, ज्यामुळे iQube ची किंमत आणखी कमी होईल.
iQube ST: या व्हेरियंटमध्ये दोन नवीन सब व्हेरियंट आहेत, जे तुम्हाला आणखी चांगले फीचर्स देतात. ही स्कूटर तुमच्या रोजच्या वापरासाठी योग्य आहे. TVS iQube ही बेस्ट रेंज आणि परवडणारी किंमत असलेली एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
Ather Energy च्या 450 सिरीजमधील सर्वात शक्तिशाली स्कूटर Ather 450 Apex आहे. याचा सर्वोच्च वेग 100 किमी/तास आहे आणि 0-40 किमी/ताशी वेग येण्यासाठी फक्त 2.9 सेकंद लागतात. या स्कूटरचे डिझाइन अतिशय आकर्षक आहे आणि ती सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. त्याची रेंज 157 किमी पर्यंत आहे. या स्कूटरची किंमत दीड लाखांपर्यंत असू शकते.
Tata Harrier च्या बेस व्हेरियंटसाठी 3 लाखांचे Down payment केल्यास किती असेल EMI?
Ola S1 X चे नवीन व्हेरियंट 4kWh बॅटरीसह येते. जे 190 किमीची रेंज आणि 90 किमी/तासाची टॉप स्पीड देते. ही एक किफायतशीर आणि शक्तिशाली स्कूटर आहे जी ग्राहकांना बेस्ट राइड देऊ शकते. या स्कूटरची किंमत 74,999 ते 95,999 रुपयांपर्यंत असू शकते.
ओला इलेक्ट्रिकने आपली नवीन ई बाईक रोडस्टर रेंज लाँच केली आहे, ज्यामध्ये रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो या तीन व्हेरियंटचा समावेश आहे. या बाईक्समध्ये मजबूत रेंज आणि दमदार परफॉर्मन्स असल्याचा दावा केला जातो. त्यांचे बुकिंग जानेवारी 2025 पासून सुरू होईल.