फोटो सौजन्य: iStock
आपल्या देशात बजेट कार्स जरी जास्त विकत असल्या तरी कित्येकांना लक्झरी कार्स आणि त्यातही त्याच्या स्पीडचे आकर्षण जास्त असते. म्हणूनच तर अशा पॉवरफुल कार्स रस्त्यावरून जाताना दिसल्या की अनेकांना त्या कार्सची भुरळ पडत असते.
यंदाच्या वर्षात अनेक उत्तम आणि आलिशान कार्स लाँच झाल्या आहेत. यातील काही त्यांच्या फीचर्स तर काही स्पीडमुळे चर्चिल्या जात आहे. टॉप स्पीड कार्स देखील या वर्षी लाँच झाल्या आहेत, ज्यांनी मार्केटमध्ये आपली हवा केली आहे. चला 2024 मधील सर्वात वेगवान कार्सबद्दल जाणून घेऊया.
Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये ‘या’ कंपन्यांचा विशेष सहभाग, सादर करणार दमदार वाहनं
2025 मध्ये, जगभरातील ऑटो कार उत्पादक कंपन्यांनी अनेक उत्कृष्ट कामगिरी देणाऱ्या कार लाँच केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक कार ते हायब्रीड आणि कंबशन इंजिन कारचा समावेश आहे. आज आपण या वर्षी लाँच झालेल्या टॉप 5 सर्वात वेगवान कारबद्दल जाणून घेणार आहोत.
वेग: फक्त 2.4 सेकंदात 0-100 किमी/ता.
टॉप स्पीड: 260 किमी/ता
0-200 किमी/ता: 7.7 सेकंदात.
Porsche Taycan Turbo S ने 2024 मध्ये लाँच केल्यानंतर सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार होण्याचा मान मिळविला आहे. यात 105 kWh बॅटरी पॅक आहे, जो 775 PS ची पॉवर आणि 1,110 Nm टॉर्क जनरेट करतो. या मोटरमुळे, Taycan Turbo S फक्त अतिशय वेगवान नाही तर उत्कृष्ट रेंज देखील देते. यामध्ये बसवलेली बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 568-630 किलोमीटरची रेंज देते.
वेग: 0-100 किमी/तास फक्त 2.8 सेकंदात.
0-200 किमी/ता: 7.2 से.
टॉप स्पीड: 332 किमी/ता.
McLaren 750S ही सर्वात जलद कंबशन-इंजिन असलेली स्पोर्ट्स कार आहे. यात 4-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे 750 PS पॉवर आणि 800 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या रीअर-व्हील ड्राइव्ह सिस्टमद्वारे ट्रॅकवर स्थिरता प्राप्त होते.
६०० रुपयांत आणा बाईकवर शाईन; वापरा ही स्पेशल किट, गाडी राहील चमकत
वेग: 0-100 किमी/तास फक्त 3.3 सेकंदात.
टॉप स्पीड: 250 किमी/ता.
ही कार उत्कृष्ट हायब्रीड तंत्रज्ञानाने लाँच करण्यात आली आहे. यात V8 इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जी जबरदस्त पॉवर निर्माण करते. त्यात 2-लिटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आणि एक छोटा बॅटरी पॅक जोडण्यात आला आहे. हे दोघे मिळून 802 PS ची पॉवर आणि 1,430 Nm टॉर्क जनरेट करतात. त्याच वेळी, त्याचे इंजिन इलेक्ट्रिक मोटरशिवाय 612 PS ची शक्ती आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते.
वेग: 0-100 किमी/ताशी फक्त 3.4 सेकंदात.
200 किमी/तास पर्यंत: 11.1 सेकंदात.
टॉप स्पीड: 302 किमी/ता.
ही स्पोर्ट्स कार म्हणून सादर करण्यात आली आहे, जी पटकन स्पीड पकडू शकते. त्यात बसवलेल्या इंजिनच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव मिळतो. M4 CS मध्ये 3-लिटर 6-सिलेंडर ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 558 PS पॉवर आणि 650 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.