Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जावा 42 आयव्हरीला रायडर्सची पसंती; आता Amazon.in आणि Flipkart वरही बुकिंगची सुविधा!

जावा 42 आयव्हरी ही निओ-क्लासिक मोटारसायकल आता Amazon.in आणि Flipkart वर बुकिंगसाठी उपलब्ध झाली असून, ग्राहकांकडून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आकर्षक आयव्हरी रंग, रेट्रो डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे ही बाईक रायडर्सचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 24, 2026 | 08:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

जावा 42 आयव्हरी या निओ-क्लासिक मोटारसायकलने भारतीय बाईकप्रेमींमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, आता ती Amazon.in आणि Flipkart या लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही बुकिंगसाठी उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने बाईक बुक करण्याचा पर्याय मिळाला असून, खरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. कंपनीच्या मते, आयव्हरी एडिशनला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तिच्या आकर्षक डिझाइनमुळे आणि रेट्रो शैलीमुळे रायडर्स विशेष प्रभावित झाले आहेत.

हा फिरता सिमेंटचा मिक्सर तुम्ही पाहिलाय का? हा आहे हायड्रॉलिक इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाचा अविष्कार!

या मॉडेलची निवड केलेल्या अनेक ग्राहकांनी आपल्या अनुभवांमध्ये बाईकच्या आरामदायी राइडिंग आणि दमदार कामगिरीचे कौतुक केले आहे. पुण्यातील शैलेंद्र एस. नाणेकर यांनी सांगितले की, कम्युटर मोटरसायकलवरून जावा 42 आयव्हरीकडे वळल्यानंतर त्यांना इंजिनची ताकद आणि लांबच्या प्रवासातील आरामदायी अनुभव लगेच जाणवला. त्यांच्या मते, ही बाईक केवळ प्रवासाचे साधन नसून लोकांमध्ये संवाद सुरू करणारे आकर्षणही ठरते. अनेक जण पार्क केलेली बाईक जवळून पाहण्यासाठी येतात आणि जुन्या जावा मोटरसायकलींच्या आठवणी सांगतात.

जावा 42 आयव्हरीची रचना कंपनीच्या समृद्ध वारशाला आधुनिक स्पर्श देणारी आहे. तिचा सौम्य आयव्हरी रंग, क्लासिक प्रमाणबद्ध डिझाइन आणि रेट्रो शैलीमुळे जुन्या मोटरसायकल संस्कृतीची आठवण ताजी होते. ‘42’ डेकल्स, टाकीवरील चेकर्ड फ्लॅग डिझाइन आणि बारकाईने केलेले डिझाइन एलिमेंट्स या मॉडेलला वेगळी ओळख देतात. त्यामुळे ही मोटारसायकल आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक आकर्षण यांचा उत्तम संगम ठरते.

आंध्र प्रदेशातील ग्राहक हरी यांनी सांगितले की, आयव्हरी रंगामुळेच त्यांनी ही बाईक निवडली. त्यांच्या मते, सणासुदीच्या पारंपरिक पोशाखासोबत या मोटारसायकलीचा रंग अधिक खुलून दिसतो आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला क्लासिक लूक मिळतो. पुद्दुचेरीचे प्रेम कुमार यांनीही शोरूममध्ये पहिल्याच नजरेत या बाईकच्या प्रेमात पडल्याचे सांगितले. त्यांच्यामते, आयव्हरी रंगाची सदाबहार शैली हीच या मॉडेलची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

परफॉर्मन्सच्या बाबतीतही जावा 42 आयव्हरी प्रभावी ठरते. यामध्ये लिक्विड-कूल्ड J-पँथर इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, तो स्मूथ आणि प्रतिसादक्षम राइडिंग अनुभव देतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हे इंजिन अनेक 350 सीसी मोटारसायकलींच्या तुलनेत अधिक ताकद प्रदान करते. ऑप्टिमाइझ्ड गिअरिंग, सुधारित थ्रोटल मॅपिंग, असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच उत्कृष्ट ब्रेकिंग आणि हँडलिंगमुळे शहरातील वापरासोबतच लांबच्या प्रवासासाठीही ही मोटारसायकल उपयुक्त ठरते.

2026 जावा 42 आयव्हरीची एक्स-शोरूम किंमत 1,84,950 रुपये (नवी दिल्ली) ठेवण्यात आली आहे. सध्या ती 118 शहरांमध्ये ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध असून, 130 अधिकृत डीलरशिप्स ई-कॉमर्सद्वारे आलेल्या चौकशी आणि विक्री प्रक्रियेसाठी कार्यरत आहेत. ग्राहकांनी Amazon.in किंवा Flipkart वरून बुकिंग केल्यानंतर संबंधित अधिकृत डीलर त्यांच्याशी संपर्क साधून उर्वरित ऑन-रोड पेमेंट, नोंदणी, विमा आणि वाहन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करतो.

उसाच्या ट्रॅक्टरची ‘हायड्रॉलिक ट्रॉली’ सिस्टीम नेमकी कशी काम करते? सविस्तरपणे समजून घ्या

याशिवाय जावा येझदी मोटरसायकल्सकडून ग्राहकांना विस्तृत मालकी हक्क सुविधा देखील देण्यात येत आहेत. यामध्ये 4 वर्षे किंवा 50,000 किमीपर्यंतची स्टँडर्ड वॉरंटी, 6 वर्षांपर्यंत एक्स्टेंडेड वॉरंटीचे पर्याय, 8 वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स आणि 5 वर्षांपर्यंत AMC सुविधा उपलब्ध आहेत. देशभरातील 450 हून अधिक सेल्स आणि सर्व्हिस टचपॉइंट्समुळे विक्रीनंतरची सेवाही ग्राहकांना सहज मिळू शकते.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्धतेमुळे जावा 42 आयव्हरी आता अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन, आधुनिक फीचर्स आणि ऑनलाईन बुकिंगची सुविधा यामुळे ही मोटारसायकल भारतीय रायडर्ससाठी एक वेगळा पर्याय म्हणून समोर येत आहे.

Web Title: Jawa 42 ivory riders choice available for flipkart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • flipkart

संबंधित बातम्या

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
1

Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
2

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
3

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.