
जीप कंपनीने आपल्या जागतिक प्रवासाचे ८५ वे वर्ष साजरी करताना भारतीय बाजारात जीप कंपासचे विशेष ‘८५थ ॲनिव्हर्सरी एडिशन’ लाँच केले आहे. या एक्सक्लुझिव्ह मॉडेलची एक्स-शोरूम किंमत २६.७० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.हे एक ‘लिमिटेड-रन’ मॉडेल असून देशभरात याच्या केवळ ८५ युनिट्सचीच विक्री केली जाईल. ग्राहक ही कार जीपच्या अधिकृत डीलरशिपवर किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करू शकतात.
कियाकडून नव्या व्हॉल्यूम एसयूव्हीवर काम सुरू! Syros आणि Seltos च्या दरम्यान लाँच होणार ही कार
या खास ॲनिव्हर्सरी एडिशनला अधिक प्रीमियम लुक देण्यासाठी १८-इंचाचे ग्लॉस-ब्लॅक अलॉय व्हील्स आणि ऑल-ब्लॅक इंटीरिअर थीम देण्यात आली आहे, ज्यावर ‘मायान गोल्ड’ रंगाचे हायलाइट्स मिळतात. कस्टमायझेशनसाठी यात ‘AXS’ पॅकेज देण्यात आले आहे, ज्याअंतर्गत ॲम्बीएंट लाइट्स, सनरूफ इल्युमिनेशन, डिजिटल IRVM, तसेच फ्रंट आणि रिअर डॅशकॅम यांसारख्या आधुनिक सुविधा जोडल्या जातात.
याशिवाय पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि पॉवर टेलगेट यांसारखे प्रीमियम फीचर्स यात कायम ठेवण्यात आले आहेत. इंजिन आणि मेकॅनिकलबद्दल बोलायचे तर यात कोणतेही तांत्रिक बदल करण्यात आले नाहीत. ही कार २.०-लिटर डिझेल इंजिनसह येते, जे १६८ bhp ची ताकद आणि ३५० Nm चा टॉर्क निर्माण करते.
Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ
हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असून यात ४x२ आणि ४x४ असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तसेच उत्तम ड्रायव्हिंग आणि रायडिंग एक्सपिरिअन्ससाठी इंडिपेंडंट रिअर सस्पेंशन, फ्रिक्वेन्सी-सिलेक्टिव्ह डॅम्पिंग (FSD) आणि स्पीड सिलेक्ट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये यात समाविष्ट आहेत.