सर्वाधिक परवडणारी ऑटोमॅटिक जीप कंपास लाँच ( सौजन्य - सोशल मीडिया )
नवीन कंपास स्पोर्ट ९एटीमध्ये १७० एचपी आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या विश्वासार्ह २.०-लिटर मल्टीजेट® II टर्बो डिझेल इंजिनची दैनंदिन ड्रायव्हिंगमध्ये स्मूथ आणि सुलभ परफॉर्मन्स देण्यासाठी डिझाइन केलेले ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. दैनंदिन प्रवासात अधिक सोयीसुविधा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वाढत्या प्रमाणावर महत्त्वाची पसंती ठरत आहे.
या लाँचबाबत मत व्यक्त करत स्टेलांटिस इंडियाच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड्सचे बिझनेस हेड आणि डायरेक्टर कुमार प्रियेश म्हणाले, “कंपासने नेहमी जीपची अस्सल क्षमता, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवाचे प्रतिनिधित्व केले आहे. कंपास स्पोर्टमध्ये ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन लाँच करून आम्ही हा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक परवडणारा बनवत आहोत.”
गेल्या काही वर्षांत, कंपासने जीपचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि रस्त्यावरील प्रबळ उपस्थितीसह तंत्रज्ञान, आराम आणि आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंग डायनॅमिक्सशी सांगड घालत भारताच्या प्रीमियम एसयूव्ही वेईकल बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपास स्पोर्ट ९एटी तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि सुलभतेच्या दमदार वैशिष्ट्यांची सिरीज अविरतपणे देत आहे. ही वेईकल ६ एअरबॅग्ज, ऑटो होल्ड आणि क्रूझ कंट्रोलने सुसज्ज आहे, तसेच या वेईकलमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो™ आणि अॅपल कारप्ले™ सह २१.३ सेमी युकनेक्ट™ टचस्क्रीन, स्टीअरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल डोअर मिरर्सचा समावेश आहे.
कंपास स्पोर्टमध्ये विविध रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये संतुलित राइड देण्यासाठी डिझाइन केलेले फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग (एफएसडी) सस्पेन्शन, तसेच आत्मविश्वासपूर्ण व रिस्पॉन्सिव्ह हाताळणीसाठी डायनॅमिक स्टीअरिंग टॉर्क (डीएसटी) देखील देण्यात आले आहे.
ग्राहक २९,९०० रुपये किमतीच्या पर्यायी अॅक्सेसरी पॅकसह आपल्या कंपास स्पोर्ट ९एटीचे अधिक वैयक्तिकरण करू शकतात, ज्यामध्ये स्टाइल, सुलभता आणि दैनंदिन उपयुक्तता वाढवण्यासाठी डिझाइन केलेल्या निवडक अॅक्सेसरीजचा समावेश आहे. या पॅकमध्ये अॅम्बियंट लाइटिंग, संतुलित राइड देण्यासाठी डिझाइन डॅशकॅम, स्वूश डीकॅल, ऑल-वेदर फ्लोअर मॅट्स आणि मड फ्लॅप्स यांचा समावेश आहे.
जीप कंपासचा विस्तृत पोर्टफोलिओ ग्राहकांना मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायांसह २डब्ल्यूडी आणि ४डब्ल्यूडी ड्राइव्हट्रेन्सचे पर्याय सतत उपलब्ध करून देतो, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या ड्रायव्हिंगच्या गरजा आणि आवडीनुसार योग्य कंपास वेईकल निवडता येते. जीप® कंपास स्पोर्ट ९एटीची किंमत २१.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि भारतातील सर्व जीप® डीलरशिप्स व स्टेलांटिस ब्रँड हाऊसेसमध्ये वेईकलची डिलिव्हरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल.
ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स ऑफ इंडियाला ₹46.62 लाखांचा तोटा; कंपनीची आर्थिक स्थिती चिंताजनक
Ans: नवीन जीप कंपास स्पोर्ट ९एटीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २१.९९ लाख रुपये आहे.
Ans: यात विश्वासार्ह २.०-लिटर मल्टीजेट® II टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे १७० एचपी पॉवर आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करते आणि त्याला ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडले आहे.
Ans: गाडीची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून भारतातील सर्व जीप® डीलरशिप्सवर सुरू होईल.






