Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JSW मोटर्सचा दिवाळीत मोठा धमाका; पुढील ४ वर्षांतही येणार १५ नवीन गाड्या

जेएसडब्ल्यू मोटर्स दिवाळीच्या काळात चेरी जेटूर टी२ वर आधारित प्लग-इन हायब्रिड एसयूव्हीसह भारतात प्रवेश करणार आहे. कंपनी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील प्लांटमधून पुढील ४ वर्षांत १५ नवीन ऊर्जा वाहने (NEVs) लॉन्च करणार असून, १० ते ३५ लाख रुपयांच्या बजेटमधील ग्राहकांना आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 26, 2026 | 03:42 PM
JSW मोटर्सचा दिवाळीत मोठा धमाका; पुढील ४ वर्षांतही येणार १५ नवीन गाड्या
Follow Us
Follow Us:

सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू (JSW) ग्रुप आता ‘जेएसडब्ल्यू मोटर्स’ (JSW Motors) या नवीन ब्रँडसह भारतीय पॅसेंजर कार बाजारात अधिकृतपणे प्रवेश करत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच सणासुदीच्या काळात आपले पहिले वाहन सादर करणार आहे. या पहिल्या गाडीचे बुकिंग नोव्हेंबर २०२६ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून, ग्राहकांना डिलिव्हरी २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या गाडीची एक्स-शोरूम किंमत ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

पहिली गाडी कोणती असणार?

रस्त्यावरील चाचणी दरम्यान दिसलेल्या प्रोटोटाइप्सनुसार, चेरी जेटूर टी२ ही एसयूव्ही नव्या रूपाने जेएसडब्ल्यू मोटर्सचे पहिले मॉडेल असू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेली ही ५-सीटर एसयूव्ही तिच्या बोल्ड आणि बॉक्स डिझाईनसाठी ओळखली जाते. जागतिक स्तरावर, ही कार ४,७८५ मिमी लांब असून तिचा व्हीलबेस २,८०० मिमी आहे.

Creta आणि Seltos ला टक्कर देण्यासाठी सज्ज Nissan Tekton; प्रीमियम फीचर्सने ग्राहकांना भुरळ घालणार

इंजिन आणि हायब्रिड तंत्रज्ञान

जेएसडब्ल्यू मोटर्स ‘न्यू एनर्जी व्हेईकल’ (NEV) धोरणावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे भारतात तिचे प्लग-इन हायब्रिड (PHEV) मॉडेल येण्याची दाट शक्यता आहे. यात १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि ३-स्पीड डेडिकेटेड हायब्रिड ट्रान्समिशनसह २६.७ kWh ची बॅटरी दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात हे मॉडेल फक्त विजेवर (Pure Electric) १०० किमीपेक्षा जास्त आणि पेट्रोल व बॅटरी मिळून तब्बल १,२०0 किमीची कम्बाईन रेंज देते. तसेच फास्ट चार्जिंगच्या मदतीने ही बॅटरी अवघ्या ३० मिनिटांत ३० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

टोयोटाची नवीन 7 सीटर SUV लवकरच येतेय मार्केटमध्ये! AWD आणि हायब्रीड पावरट्रेन सह येणाऱ्या ‘टोयोटा हायरायडर’ बद्दल जाणून घ्या

भविष्यातील मोठी योजना आणि उत्पादन

पहिल्या प्रीमियम मॉडेलनंतर, जेएसडब्ल्यू मोटर्स साधारण १८ ते २० लाख रुपये किंमत असलेल्या दुसऱ्या गाडीवर काम करेल. कंपनीची पुढील चार वर्षांत १५ नवीन ऊर्जा वाहने (हायब्रिड आणि इलेक्ट्रिक) बाजारात आणण्याची योजना आहे. म्हणजेच, एकदा सुरुवात झाल्यावर दर तीन महिन्यांनी एक नवीन गाडी लॉन्च केली जाईल. या गाड्यांची किंमत १० लाख ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

या सर्व गाड्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील ३०० एकरच्या प्लांटमध्ये केले जाईल. या प्लांटची सुरुवातीची वार्षिक उत्पादन क्षमता ५ लाख वाहनांची असेल. स्थानिक उत्पादनामुळे गाड्यांचा खर्च नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

Web Title: Jsw motors to launch 15 brand new cars in next 4 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.