Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!

जून २०२६ च्या सेडान विक्रीमध्ये मारुती डिझायरने १७,८९९ युनिट्ससह ५७ टक्क्यांहून अधिक बाजारपेठेवर कब्जा करत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या यादीत ह्युंदाई ऑरा दुसऱ्या तर होंडा अमेझ तिसऱ्या क्रमांकावर राहिली असून मिडसाईझ सेगमेंटमध्ये व्हर्टस आघाडीवर आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 11, 2026 | 12:19 AM
जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!
Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात जून २०२६ मधील सेडान कार विक्रीचे ताजे आकडे समोर आले असून, मारुती सुझुकी डिझायरने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. संपूर्ण सेडान सेगमेंटमध्ये एकट्या डिझायरचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जून २०२६ मध्ये देशात एकूण ३१,१८३ सेडान गाड्यांची विक्री झाली, जी मागच्या वर्षाच्या तुलनेत १०.१ टक्क्यांनी अधिक आहे.

मारुती डिझायर आणि सब-४ मीटर गाड्यांची बाजी

मारुती डिझायरने जून २०२६ मध्ये १७,८९९ युनिट्सची बंपर विक्री करत १५.६% वार्षिक वाढ नोंदवली आहे. सध्या या सेगमेंटमध्ये डिझायरचा बाजारपेठेतील वाटा तब्बल ५७.४% एवढा प्रचंड आहे. दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई ऑरा असून, तिने ५,९७७ युनिट्ससह १०.४% वाढ मिळवली आहे. तर होंडा अमेझ २,९३७ युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर राहिली. अमेझने वार्षिक तुलनेत २९.२% ची सर्वांत मोठी आणि नेत्रदीपक झेप घेतली आहे.

फोक्सवॅगन टायरॉन 5-सीटर भारतात लॉन्च; किंमत 41.99 लाख रुपयांपासून सुरू

मिडसाईझ सेडानमध्ये ‘व्हर्टस‘ अव्वल, पण विक्रीत घट

मिडसाईझ सेडान सेगमेंटचा विचार केला तर फोक्सवॅगन व्हर्टस पहिल्या क्रमांकावर आहे, मात्र तिच्या विक्रीत ३२.८% ची मोठी घसरण झाली असून जूनमध्ये केवळ १,१९५ गाड्या विकल्या गेल्या. याउलट, तिची मुख्य प्रतिस्पर्धी स्कोडा स्लाव्हियाने २०.९% ची सकारात्मक वाढ नोंदवत १,०८३ युनिट्सची विक्री केली आणि या यादीत पाचवे स्थान मिळवले. नुकताच दुसरा मिड-सायकल अपडेट मिळालेली होंडा सिटी ७४५ युनिट्ससह सहाव्या स्थानावर राहिली, ज्यात ५.१% ची किरकोळ वाढ झाली आहे.

यामाहाची मोठी झेप! E85 इथेनॉलवर धावणारी पहिली ‘FZ Blue Flex’ भारतीय बाजारात दाखल

‘टाटा टिगोर‘ आणि ‘व्हर्ना‘च्या विक्रीत मोठी घसरण

टाटा टिगोर थेट सातव्या स्थानावर घसरली असून, तिची विक्री २३.६ टक्क्यांनी घटून ६०2 युनिट्सवर आली आहे. ह्युंदाई व्हर्नालाही यंदा ग्राहकांनी पाठ दाखवल्याचे चित्र असून, तिची विक्री ३१.९ टक्क्यांनी घसरून ५५४ युनिट्सवर स्थिरावली. लक्झरी श्रेणीतील महागडी टोयोटा कॅम्री १९१ युनिट्ससह नवव्या स्थानावर असून तिने ६.१% ची संथ पण स्थिर वाढ राखली आहे.

थोडक्यात सांगायचे तर, भारतीय ग्राहकांचा सब-कॉम्पॅक्ट सेडान, विशेषतः मारुती डिझायरवर अजूनही प्रचंड विश्वास असल्याचे या आकडेवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: June 2026 sedan car sales hike automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 12:19 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

700 किमीपेक्षा जास्त रेंजसह येतायत व्होल्वोच्या २ नव्या ई-कार; १२ ऑक्टोबरला लाँच होणार व्होल्वो EX90 आणि ES90!
1

700 किमीपेक्षा जास्त रेंजसह येतायत व्होल्वोच्या २ नव्या ई-कार; १२ ऑक्टोबरला लाँच होणार व्होल्वो EX90 आणि ES90!

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
2

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!
3

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
4

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.