Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीग (TPL) यांनी तीन वर्षांच्या ऐतिहासिक भागीदारीची घोषणा केली असून, किया इंडिया आता लीगची एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सर असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 07:20 PM
किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

Follow Us
Follow Us:

मुंबई : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल) यांनी आज एका ऐतिहासिक तीन वर्षांच्या सहयोगाची घोषणा केली आहे, ज्यांतर्गत किया इंडिया या लीगची एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सर म्हणून जोडले गेली आहे. किया इंडियाचा टेनिस क्षेत्रातील प्रदीर्घ जागतिक वारसा आणि भारतातील या खेळाभोवती असलेली टीपीएलची वाढती परिसंस्था एकत्र आणणारा हा सहयोग टेनिसचे महत्त्व व व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरातील नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठीच्या सामायिक उद्दिष्टावर आधारित आहे.

हा बहु-वर्षीय करार भारतातील टेनिसमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. या कराराच्या माध्यमातून जगातील आघाडीचा ऑटोमोटिव्ह ब्रँड अशा एका स्वदेशी चळवळीशी जोडला गेला आहे, जी आपल्या लीग आणि अॅपच्या माध्यमातून देशातील टेनिसचा इतिहास नव्याने लिहीत आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनसोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून जवळपास २५ वर्षांचा जागतिक टेनिस वारसा लाभलेल्या किया इंडियाने नेहमी तरुणांवर केंद्रित आणि प्रत्‍यक्ष सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे या खेळाभोवती अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्यावर भर दिला आहे. टीपीएलसोबत या सहयोगामधून भारतातील समकालीन क्रीडा संस्कृतीला आकार देणाऱ्या आधुनिक क्रीडा मंचांना पाठिंबा देण्याप्रती किया इंडियाची निरंतर कटिबद्धता दिसून येते.

RTO India: फक्त 100 रुपयांच्या निष्काळजीपणामुळे बसणार 10,000 रुपयांचा फटका; गाडी असेल तर ‘हा’ नियम आत्ताच वाचा

किया इंडियाचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट – सेल्स आणि मार्केटिंग, अतुल सूद म्हणाले, “किया इंडियामध्ये आमचा विश्वास आहे की, खेळांमध्ये आकांक्षांना प्रेरित करण्याची आणि अर्थपूर्ण सांस्कृतिक बंध निर्माण करण्याची ताकद असते. टेनिस खेळ आपल्या तरुण ऊर्जा, जागतिक आकर्षण आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे आमच्या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाशी तंतोतंत जुळणारा आहे. टेनिस प्रीमियर लीगसोबत आमचा सहयोग भारतातील नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी टेनिस अधिक मनोरंजक आणि सुसंगत बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टाला सादर करतो. टीपीएलची वाढती परिसंस्था आणि तळागाळातील स्तरावर असलेला त्यांचा भर यांच्या माध्यमातून या खेळातील वाढता सहभाग, लोकांमधील वाढती उत्सुकता आणि गुणवान खेळाडूंच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक, कुणाल ठाकूर म्हणाले, “किया इंडियासोबत हा सहयोग आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या अॅप, लीग आणि रेस टू गोल्ड सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रबळ परिसंस्था निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. किया इंडियासारख्या जागतिक ब्रँडने आमच्या या उद्दिष्टाला ओळखणे आणि त्याला पाठिंबा देणे, यामुळे आम्‍हाला आमच्या प्रयत्‍नांना अधिक मोठ्या प्रमाणावर नेण्याचा आणि भारतातील टेनिसच्या भविष्यावर खऱ्या अर्थाने सकारात्मक प्रभाव पाडण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”

टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक मृणाल जैन म्हणाले “टीपीएलने नेहमी परिपूर्ण टेनिस परिसंस्था निर्माण करण्यावर विश्वास ठेवला आहे, ज्यामध्ये तरुण प्रतिभा शोधण्यापासून ते त्यांना सर्वोच्‍च पातळीवर एक व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. किया इंडियासोबत सहयोग करण्‍यासह आम्ही प्रायोजक मिळवला आहे, तसेच आम्‍हाला भारतासाठी चॅम्पियन्स (विजेते) घडवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला पाठिंबा देणारा दीर्घकालीन भागीदार मिळाला आहे.”

या बहु-वर्षीय सहयोगाचा भाग म्हणून, किया इंडिया टेनिस प्रीमियर लीगच्या संपूर्ण परिसंस्थेशी जोडली जाईल, ज्यामध्ये टीपीएल अॅप आणि सर्व ८ फ्रँचायझी टीम्सच्या जर्सीवर मुख्य स्‍पॉन्‍सर म्हणून किया इंडियाचे नाव समाविष्ट असेल. हा सहयोग या खेळाभोवती नागरिकांचा अधिक सहभाग आणि उत्साह वाढवण्याच्या किया इंडियाच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे, तसेच टीपीएलच्या तळागाळातील उपक्रमांना अधिक दृढ करेल, ज्यांनी देशभरात स्पर्धांचे आयोजन करण्यात आणि उदयोन्मुख टेनिसपटू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गेल्या दोन वर्षांत, टीपीएलने आपल्या ‘रेस टू गोल्ड स्कॉलरशिप’ या प्रमुख उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील ८० हून अधिक तरुण टेनिसपटूंना पाठबळ दिले आहे. आता किया इंडियासोबत सहयोगाने या उद्दिष्टाचा आणखी विस्तार केला जात आहे, तसेच येत्या काही वर्षांत आणखी १२० हून अधिक तरुण खेळाडूंना सक्षम करण्याचे ध्येय आहे. याद्वारे २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकू शकतील अशा ऑलिम्पिक-स्तरीय प्रतिभावान खेळाडूंना घडवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टीपीएलचा तळागाळातील खेळाडूंवर असलेला फोकस आणि या खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन किया इंडिया या सहयोगाकडे भारतातील टेनिसमधील रस वाढवण्यासाठी आणि वाढता विस्तार, रचना व शाश्वत गुंतवणुकीच्या माध्यमातून या खेळाच्या दीर्घकालीन विकासाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून पाहते.

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

Web Title: Kia india tennis premier league three year partnership india tennis growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • automobile news
  • india
  • kia

संबंधित बातम्या

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
1

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर
2

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
3

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार
4

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.