Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता

नवीन किआ सेल्टोस हायब्रिडमध्ये 1.6-लिटर पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि 2 ड्राइव्ह कॉन्फिगरेशन मिळतात. युरोपमध्ये सादर झालेल्या या एसयूव्हीमध्ये 12.3-इंचाचे डिस्प्ले, 536 लिटर बूट स्पेस आणि आधुनिक ड्रायव्हिंग फीचर्स आहेत. भारतातील लाँचबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 13, 2026 | 03:42 PM
पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता
Follow Us
Follow Us:
  • किया सेल्टोस हायब्रिडमध्ये 1.6-लिटर पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे कॉम्बिनेशन मिळते.
  • फ्रंट-व्हील ड्राइव्ह मॉडेल 18.5 kmpl पर्यंत, तर e-AWD व्हेरिएंट 17.2 kmpl पर्यंत मायलेज देते.
  • भारतात पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे, पण कंपनीने अद्याप तारीख जाहीर केलेली नाही.

भारतात लोकप्रिय असलेल्या किया सेल्टोस एसयूव्हीच्या नव्या हायब्रिड मॉडेलची चर्चा सुरू झाली आहे. 2026 पॅरिस मोटर शोमध्ये किआने दुसऱ्या जनरेशनची सेल्टोस हायब्रिड सादर केली आहे. पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर, ऑल-व्हील ड्राइव्हची सुविधा आणि चांगले मायलेज ही या एसयूव्हीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या मॉडेलचे भारतात पुढील वर्षी आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, पण भारतीय लाँचची तारीख अजून कन्फर्म झाली नाही.

18.5 kmpl पर्यंत मायलेज, दोन हायब्रिड ऑप्शन

नवीन किआ सेल्टोस हायब्रिडमध्ये 1.6-लिटर GDI पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंट-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटमध्ये एकत्रित 152 hp पॉवर मिळते, तर इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटमध्ये 176 hp पॉवर मिळते. दोन्ही मॉडेलमध्ये 6-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे.

युरोपमधील WLTP चाचणीनुसार, फ्रंट-व्हील ड्राइव्ह मॉडेल 18.5 kmpl पर्यंत, तर e-AWD व्हेरिएंट 17.2 kmpl पर्यंत मायलेज देते. हे आकडे चाचणीवर आधारित असून भारतातील प्रत्यक्ष मायलेज वेगळे असू शकते. e-AWD मॉडेलमध्ये मागच्या चाकांसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक मेकॅनिकल कनेक्शनशिवाय चारही चाकांना ड्राइव्ह देण्याची व्यवस्था मिळते.

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

फीचर्स आणि स्पेसमध्येही दमदार

या एसयूव्हीमध्ये सुमारे 1.3 kWh लिथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे ब्रेक लावताना ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवण्यास मदत होते. याशिवाय Vehicle-to-Load फीचरद्वारे बाहेरील उपकरणांना वीज पुरवता येते.

केबिनमध्ये 12.3-इंचाचे 2 डिस्प्ले, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, ओव्हर-द-एअर अपडेट्स आणि AI व्हॉइस असिस्टंट मिळतो. निवडक व्हेरिएंटमध्ये हेड-अप डिस्प्ले आणि डिजिटल कीसारखी फीचर्सही आहेत.

एसयूव्हीची लांबी 4,430 mm, व्हीलबेस 2,690 mm आणि बूट स्पेस 536 लिटर आहे. मागच्या सीट्स फोल्ड केल्यानंतर सामान ठेवण्याची जागा 1,494 लिटरपर्यंत वाढते.

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

भारतात किती असेल किंमत?

जर्मनीमध्ये या मॉडेलची सुरुवातीची किंमत 37,490 युरो आहे, तर e-AWD व्हेरिएंटची किंमत 40,190 युरो आहे. भारतीय रुपयांतील रूपांतरणानुसार ही रक्कम अनुक्रमे सुमारे 39.87 लाख आणि 42.74 लाख रुपये होते. पण या युरोपीय किंमती आहेत; भारतातील संभाव्य किंमत म्हणून त्यांचा थेट विचार करू नये.

सध्या भारतात किआ सेल्टोस पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह विकली जाते. हायब्रिड मॉडेल आल्यास मायलेज आणि आधुनिक टेक्नोलॉजीला प्राधान्य देणाऱ्या कस्टमर्ससाठी तो एक नवा ऑप्शन ठरू शकतो. मात्र भारतीय व्हेरिएंटची फीचर्स, किंमत आणि लाँचची तारीख याबाबत कंपनीकडून स्पष्ट माहिती येणे बाकी आहे.

Web Title: Kia seltos hybrid europe debut india launch mileage features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • automobile
  • kia
  • Kia Seltos
  • SUV cars

संबंधित बातम्या

पावसाळ्यात ओला S1 Z की TVS आयक्यूब; सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती ई-स्कूटर आहे सर्वोत्तम
1

पावसाळ्यात ओला S1 Z की TVS आयक्यूब; सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती ई-स्कूटर आहे सर्वोत्तम

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
2

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
3

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
4

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.