
देशातील आघाडीची मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनी किया इंडियाने आपल्या आयसीई, हायब्रिड आणि ईव्ही पोर्टफोलिओमध्ये ‘अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्रॅम’च्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली. हा उपक्रम ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या भविष्यातील मूल्याची खात्री देऊन गाडी बदलणे किंवा अपग्रेड करणे अधिक सुलभ व सोयीस्कर बनवतो.
या विस्तारित प्रोग्रामअंतर्गत, पात्र ग्राहकांना ३ वर्षांच्या कालावधीत आयसीई मॉडेल्ससाठी ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्ही मॉडेल्ससाठी ७० टक्क्यांपर्यंत अॅश्युअर्ड रेसिड्यूअल व्हॅल्यूचा (रीसेल व्हॅल्यू) लाभ घेता येईल. वाहनाच्या खरेदीच्या वेळीच भविष्यातील खात्रीशीर मूल्य निश्चित होत असल्याने, ग्राहकांना अधिक पारदर्शकतेने आणि विश्वासाने त्यांच्या वाहनाच्या मालकीहक्काच्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.
या प्रोग्रामअंतर्गत किया इंडियाच्या सोनेट, सिरोस, न्यू सेल्टॉस, कॅरेन्स, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि सोरेंटो या प्रमुख मॉडेल्सचा समावेश करण्यात आला असून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, हायब्रिड आणि ईव्ही अशा सर्व उपलब्ध पॉवरट्रेन पर्यायांवर ही योजना लागू असेल. ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन आयसीई मॉडेल्ससाठी ३, ४ किंवा ५ वर्षे आणि ईव्ही मॉडेल्ससाठी ३ किंवा ४ वर्षांचे लवचिक कालावधी पर्याय देण्यात आले आहेत. यासोबतच वार्षिक १०,००० किमी, १५,००० किमी किंवा २०,००० किमीचे मायलेज पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून, एकूण मालकी कालावधीत १,००,००० किमीपर्यंतच्या प्रवासाचा यात समावेश होतो.
किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले* , ” वाहन खरेदी हा एक दीर्घकालीन निर्णय असतो आणि ग्राहक भविष्यातील रीसेल व्हॅल्यू व अपग्रेडच्या सुलभतेबाबत निश्चितता शोधत असतात. ३ वर्षांत आयसीईवर ७५ टक्क्यांपर्यंत आणि ईव्हीसाठी ७० टक्क्यांपर्यंत उद्योगातील सर्वोत्तम पुनर्विक्री मूल्याची (रिसेल व्हॅल्यू) गॅरंटी देऊन आम्ही ग्राहकांचा विश्वास अधिक मजबूत करत आहोत. पहिल्या खरेदीपासून ते पुढील एक्सचेंज किंवा अपग्रेडपर्यंत सातत्यपूर्ण मूल्य देण्याची आमची कटिबद्धता यातून सिद्ध होते.”
हा प्रोग्राम सर्व अधिकृत किया डीलर भागीदारांमार्फत उपलब्ध केला जाईल. पात्र ग्राहक नवीन वाहन खरेदी करताना लागू निकषांनुसार या योजनेत नोंदणी करू शकतात आणि निवडलेल्या कालावधीच्या शेवटी अटी व शर्तीनुसार खात्रीशीर बायबॅक मूल्याचा लाभ घेऊ शकतात.