
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय बाजारात kia च्या विविध सेगमेंटमध्ये अनेक कार्सची विक्री केली जाते. त्यामध्ये कंपनीची मिड-साइज SUV म्हणून Kia Seltos हीदेखील उपलब्ध आहे. मीडिया अहवालांनुसार, या SUVची नवी जनरेशन लाँच होण्यापूर्वी पुन्हा एकदा टेस्टिंगदरम्यान दिसून आली आहे. या नवीन मॉडेलबाबत कोणती माहिती समोर आली आहे,त्याबद्दल जाणून घेऊयात.
ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किया लवकरच भारतीय बाजारात नव्या जनरेशनची Seltos लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँचिंगपूर्वी या SUVचे जागतिक स्तरावर प्रथम अनावरण केले जाणार आहे. सध्या ती भारतात टेस्टिंगच्या टप्प्यात असून, अलीकडेच ही SUV टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या जनरेशनची Kia Seltos सध्याच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी असू शकते, ज्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळेल. यावेळी डिझाइन अधिक सरळ, कडा उठावदार आणि बॉक्सी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हेडलाइट्स, टेललाइट्स आणि बंपरमध्ये बदल करून SUVला पूर्णपणे नवीन लुक दिला जाऊ शकतो. तसेच सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक फीचर्सही यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
रिपोर्ट्सनुसार, नव्या जनरेशनच्या Kia Seltos मध्ये खालील अद्ययावत फीचर्स देण्यात येऊ शकतात:
किया कंपनी 10 डिसेंबर रोजी ग्लोबल लेव्हलवर नव्या जनरेशनची Kia Seltos सादर करणार आहे. दक्षिण कोरियातील कार्यक्रमात तिचे अनावरण होईल, त्यानंतर ती सर्वप्रथम दक्षिण कोरिया बाजारात लाँच होईल. 2026 मध्ये ही SUV भारतीय बाजारासह इतर देशांमध्येही उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.